दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गावातील सर्व वॉर्डमधील कचरा हा गावठाणातील वैकुंठभूमीलगत असलेल्या जागेत टाकण्यात आला आहे. केवळ गावातीलच नाही तर, ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल, ढाबे, चायनीज गाड्या, इतर व्यावसायिक, हॉस्पिटल, मोठ्या सोसायट्या, प्लॉटिंगधारकांचा कचरा, मेसवाले, असे एक ना अनेक प्रकारचा कचरा शिक्रापूर ग्रामपंचायत वाहनांमधून घंटागाड्यांमधून हा कचरा गोळा करून या ठिकाणी आणून टाकला जातो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर हा कचरा जाळण्यात येत असल्याने हवा प्रदूषणही वाढत चालले आहे. दरम्यान, परिसरात राहणाऱ्या लोकांना ठसका, खोकला, फुफ्फुसाचे आजार, डोळ्यांची जळजळ, दमा यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या कचऱ्याचा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावावा अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिक्रापूर माहिती सेवा समिती शिरूर तालुका अध्यक्ष संतोष काळे, कार्याध्यक्ष शरद टेमगिरे, विजय लोखंडे, अंकुशराव घारे व काही ग्रामस्थांनी दिला.
कचऱ्याच्या समस्येमुळे आमरण उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:09 AM