पुणे : राज्यामध्ये अनेक भागामध्ये सोमवारी सायंकाळी गारपीठ झाली. त्यामुळे पीकांचे नुकसान झाले असून, आजही विदर्भ, मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने आज विदर्भामधील चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणी वीजांसह हलक्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहेे. तसेच यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवड्यातील बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात प्रचंड गारठा होता, तो आता कमी झाला आहे. किमान तापमान आता १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.