शहरं
Join us  
Trending Stories
1
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
2
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
3
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
4
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
5
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
6
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
7
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
8
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
9
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
10
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
12
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
13
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
14
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
15
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
16
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
17
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
18
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
19
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
20
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ

Maharashtra Rain: आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज

By श्रीकिशन काळे | Updated: September 2, 2024 17:02 IST

महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असेल

पुणे: सध्या राज्यामध्ये जोरदार पाऊस होत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात पूर आलेले आहेत. तर हवामान विभागाने मंगळवारी (दि.३) राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे, तसेच दोन दिवसांनंतर पाऊस ओसरेल, असाही अंदाज वर्तविला आहे. 

राज्यातील मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक आहे. येथील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट आहे. तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

मंगळवारी (दि.३) आणि बुधवारी (दि.४) विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने वर्तविला आहे. तर मंगळवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी तसेच खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.  मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

बुधवारपासून (दि.४) मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असेल. गुरुवारी (दि.५) विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसSocialसामाजिकenvironmentपर्यावरणNatureनिसर्गWaterपाणीDamधरण