हडपसर : पथारी व्यावसायिक पंचायत हडपसर पथारी व्यावसायिक यांचा बायोमेट्रिक सर्व्हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार २०१४मध्ये मनपा अधिकारी यांनी व्यावसायाच्या जागेवर येऊन केला आणि वर्गवारीनुसारनुसार ए, बी, सी, डी, ई प्रमाणपत्र म्हणजे लायसन्स दिले. हे प्रमाणपत्र शंभर टक्के मनपाचे असूनही वाटप केले नाही. पुनर्वसनपण करीत नाहीत. कारवाई तर जोरात चालू आहे. सर्वांचे पुनर्वसन करावे; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पथारी व्यावसायिक पंचायतीने दिला आहे.
पथारी व्यावसायिक म्हणतात, की कार्यवाही झालीच पाहिजे. जे अनधिकृत आहेत; परंतु परवानाधारक व पथारी हातगाडी यांच्यावर केली जाते. बनावट पथारीवाले, आज काल आलेले व्यावसायिक यांच्यावर कारवाई होत नाही.
पर्यायी जागांचा खो-खोपुनर्वसनसाठी दाखवलेल्या जागा शितळादेवीच्या पाठीमागे होती. तेथे लगेच माजी उपमहापौर यांच्या सूचनेनुसार प्रधान सरांच्या नावे गार्डन झाले. दुसरी जागा गाडीतळ जुना कालवा लाकडाची वखारीच्या पाठीमागे दाखवली होती. माजी नगरसेवक सुनील बनकर यांच्या सूचनेनुसार तेथेही गार्डन झाले, अजून पाठीमागे जागा पाटबंधारे खात्याची आहे.
कायमस्वरूपी ती द्यायला हरकत नाही. तेथून डीपी रोड होणार आहे. सर्व सभासद यांच्याशी चर्चा झाली आहे. शिवाय, डॉ. बाबा आढाव यांनी केंद्र सरकार दिल्ली यथे आंदोलन करून अंदाजे ५० कोटी रुपये निधी पुणे महापालिकेत आणला आहे.महत्त्वाचा मुद्दा डी आणि ई प्रमाणपत्र व्यावसायिक यांच्यावर कारवाई होते. परंतु, सर्व व्यावसायिकांच सर्वेक्षण चार वर्षांपूर्वी एकाच वेळी झाले आहे. तेपण जुने आहे. प्रमाणपत्र असणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करू नये. सर्वांचेच पुनर्वसन करावे जर कारवाई कराल, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा पथारी व्यावसायिक पंचायत हडपसर अध्यक्ष मोहन चिंचकर, उपाध्यक्ष सुलतान बागवान, भूषण कामठे, पुष्पा अगरवाल, राजेंद्र यवते, रमेश भंडारी, विनोद कर्पेकर, शामलाल श्रीवास्तव आदींनी दिला आहे.