शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

दंड भरायला सांगितला म्हणून भररस्त्यात मांडले ठाण

By admin | Published: July 09, 2015 2:57 AM

मंगळवारची दुपारची वेळ... ठिकाण सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर... एक माणूस दुचाकीवरुन जाताना त्याने सिग्नल तोडला...

पुणे : मंगळवारची दुपारची वेळ... ठिकाण सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर... एक माणूस दुचाकीवरुन जाताना त्याने सिग्नल तोडला... नियमाचे उल्लंघन केले म्हणून वाहतूक पोलिसांनी अडविले आणि दंड भरायला सांगितला. त्यामुळे चिडलेला दुचाकीस्वार दंड भरणार नाही असे सांगत चक्क वाहने जात असलेल्या रस्त्याच्या मध्यात ठाण मांडले. वाहतूक पोलिसांनी समजूत काढूनही न ऐकणाऱ्या या बहाद्दरावर कारवाईचा बडगा उगडण्याचे आदेश मिळताच, त्याने चुपचापणे दंड भरला. हा भलता प्रकार बुधवारी शहरातील चर्चेचा विषय झाला होता. व्हॉट्सअ‍ॅपवरून हा विषय आणि त्याची छायाचित्रे दिवसभर फिरत होती.सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर येथे सिग्नल तोडला म्हणून एका दुचाकीस्वाराला महिला पोलिसांनी अडविले आणि १०० रुपयांचा दंड भरायला सांगितले. दंड भरायला सांगताच दुचाकीस्वार चिडला आणि त्याने आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि थेट वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याच्या मधोमध जाऊन तो बसला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मात्र तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. वाहतुकीला अडथळा होत असल्याने तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्या दुचाकीस्वाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या दुचाकीस्वार ऐकायलाच तयार नव्हता. त्या वेळी दत्तवाडी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक भुजबळ तेथून चालले होते. हा प्रकार पाहून भुजबळ यांनी वाहतूक पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. दुचाकीस्वाराचा हा प्रताप पाहून भुजबळ यांनी संबंधित दुचाकीस्वारावर थेट वाहन परवाना जप्त करण्याची कारवाई करा, असा आदेश दिला. हे ऐकताच दुचाकीस्वार रस्त्यावरून उठला आणि त्याने चुपचाप १०० रुपये दंड भरला आणि तो निघून गेला. मात्र हा प्रकार या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला. काहीजणांनी या घटनेची छायाचित्रे काढली आणि आज ती व्हॉट्सअ‍ॅपवर टाकली. त्यामुळे बुधवारी शहरात चर्चा रंगली होती.(प्रतिनिधी)