शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

तरंगता पूल पुरात धोकादायक

By admin | Published: June 29, 2015 6:40 AM

मावळ आणि मुळशी तालुक्यांत जोरदार पाऊस होऊन मुळा नदीची पाणीपातळी वाढल्यास पुलावरील वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे गैरसोय वाढणार असून, आंदोलनापूर्वीची स्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे.

मिलिंद कांबळे, पिंपरी बोपखेलच्या रहिवाशांसाठी कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगने (सीएमई) तरंगता पूल बांधून देऊन त्यावरून रहदारी सुरू केली आहे. मावळ आणि मुळशी तालुक्यांत जोरदार पाऊस होऊन मुळा नदीची पाणीपातळी वाढल्यास पुलावरील वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे गैरसोय वाढणार असून, आंदोलनापूर्वीची स्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सीएमईने बोपखेल-दापोडी हा नेहमीच्या वापरातील रस्ता १३ मे रोजी ग्रामस्थांसाठी बंद केला. त्याविरोधात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून दगडफेकीचा प्रकार घडला. सुमारे २०० जणांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे तणाव वाढला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आदेश दिल्यानंतर सीएमईने तात्पुरत्या स्वरूपात बोपखेल-खडकी असा तरंगता पूल बांधला. तो ७ जूनला खुला करण्यात आला. अद्याप पुणे परिसरात पावसाचा जोर नाही. पावसाने जोर धरल्यास नदीतील पाण्याची पातळी वाढून रस्ता पाण्यात जाण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूने पूल बांधून ठेवल्याने तो तरंगत राहील. पूर आल्यास हा पूल वाहून जाण्याचा धोका आहे. पाणीपातळीतील वाढीमुळे पूल व रस्त्यामध्ये अंतर पडल्यास सीएमईचे जवान त्वरित दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करतील. मात्र, त्यापूर्वी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक४हा तात्पुरता पूल असल्याने त्यावरून नियमितपणे वाहतूक करणे सुरक्षेच्या दृष्टीने किती योग्य ठरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मावळ आणि मुळशी तालुका परिसरात नुकताच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मुळा आणि पवना नदीपात्रात वाढ होऊन पातळी वाढली. दापोडी येथे पवना नदी मुळेला मिळते. त्यापुढे प्रवाह वाढून खडकी, बोपखेल परिसरातून मुळा नदी वेगात वाहते. वेगातील पाणी आणि जमा झालेल्या जलपर्णीमुळे शनिवारी (दि. २७) पहाटे पुलाचा दोर तुटला. त्यामुळे पूल आणि खडकी रस्त्यामध्ये अंतर पडले होते. पूल धोकादायक झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सीएमईच्या जवानांनी त्वरित दुरुस्ती करीत दोर बांधून, खडी आणि माती टाकून रस्ता दुरुस्त केला. दुपारनंतर नियमित वाहतूक सुरू झाली. गॅस सिलिंडरसह सायकल वाहून गेली गॅस सिलिंडर घेऊन एक जण सायकलवर चालला होता. पुलावरून जाताना त्याचा तोल गेला. सिलिंडरसह सायकल पुलावरून नदीपात्रात पडली. सुदैवाने सायकलस्वार बचावला. शोध घेऊनही सायकल आणि सिलिंडर सापडले नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली. रस्त्यासाठी अद्याप एनओसी नाही खडकीच्या ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या बाजूने ४०० मीटर अंतराचा पक्का रस्ता करण्यास लष्करी विभागांनी अद्याप ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिलेले नाही. सीएमईने नदीकडेच्या दलदलीत मुरुम आणि खडी टाकून रस्ता बनविला आहे. पावसाच्या पाण्यामुळे तेथे वारंवार चिखल होत आहे. त्यात वाहनाचे चाक रुतून बसते. ये-जा करणे गैरसोईचे ठरत आहे. एनओसी देण्याचा आदेश संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बैठकीत दिले होते. ६ जुलैला सुनावणी बोपखेल-दापोडी हा सोईचा रस्ता लष्करी जाचातून खुला करून महापालिकेच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग धोदाडे यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याबाबतचा निर्णय सीएमईच्या बाजूने लागला. सीएमईने सुरक्षेच्या कारणाने हा रस्ता १३ मेपासून बंद केला. या संदर्भात महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय १ जुलैला प्रतिज्ञापत्र सादर करेल. त्यावर ६ जुलैला सुनावणी होईल. पाणी वाढल्यास मुळा नदीला पूर येऊ शकतो. साहजिकच तरंगत्या पुलास धोका होऊ शकतो. खडकी जोडरस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत आहे. सीएमईचे जवान तेथे मुरुम टाकून त्वरित दुरुस्ती करीत आहेत. लष्करी विभागांनी एनओसी दिल्यास महापालिकेतर्फे त्वरित डांबरीकरण केले जाईल. - संजय काटे, नगरसेवक सीएमईतील रस्ता आमचा नाही, असे महापालिकेने सांगितल्याने उच्च न्यायालयाने सीएमईच्या बाजूने निकाल दिला. कागदपत्रे आणि पूर्वीचे दाखले तपासल्यास सीएमईतील रस्त्याचा हक्क बोपखेलगावाकडे आहे. या संदर्भात महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयास प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. - श्रीरंग धोदाडे, सामाजिक कार्यकर्ते