शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

साहित्य खरेदीवर राहणार वॉच, वर्षाला शंभर कोटींची वस्तू खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 1:49 AM

महापालिका : वर्षाला शंभर ते सव्वाशे कोटींची वस्तू खरेदी

पुणे : महापालिकेच्या विविध विभागांच्या वतीने वर्षाला तब्बल शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची विविध प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु कोणत्या विभागाने नक्की किती खरेदी केली, प्रत्यक्ष किती वस्तू आल्या हे तपासण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा महापालिकेकडे नाही. यामुळेच महापालिकेच्या वस्तू खरेदीवर वॉच ठेवण्यासाठी प्रशासनाने आता खास ‘मटेरिअल मॅनेजमेंट’ हेस्वतंत्र अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपमुळे कोणत्या विभागाला कशाची गरज आहे, किती वस्तू खरेदी केल्या, प्रत्यक्ष किती आल्या याची कार्यालयात बसून माहिती उपलब्ध होणार आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमार्फत साहित्य खरेदी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येतात. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत कोणत्याही वस्तूची खरेदी करताना निविदाप्रक्रिया राबवून अथवा शासनाने निश्चित केलेल्या दर सूचीनुसार वस्तंूची खरेदी केली जात होती. परंतु यामध्ये प्रशासनाकडून अनेक पळवाटा काढून चढ्या दराने वस्तू खरेदी करण्यात येत होत्या. वस्तू खरेदीतील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयांसाठी आॅनलाईन खरेदी (जीईएम) पोर्टलचा पर्याय समोर आणला. या जीईएम पोर्टलवर सध्या वाहनापासून ते थेट पेन, पेन्सिलपर्यंत सर्व वस्तू उपलब्ध आहेत.आॅनलाईन खरेदी महापालिकेचे पैसे काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. परंतु नक्की कोणत्या विभागाला किती वस्तूंची गरज आहे, किती खरेदी केल्या व प्रत्यक्ष किती वस्तू त्या विभागाला मिळाल्या याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र ‘मटेरिअल मॅनेजमेंट’ हे स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.वस्तू खरेदीचा घोळ कमी होणारमहापालिकेच्या वतीने वाहन खरेदीपासून, संगणक, कार्यालयीन उपयोगाचे साहित्ये मोठ्या प्र्रमाणात खरेदी केले जाते. केवळ साहित्य खरेदीवर महापालिकेचे वर्षाला तब्बल शंभर ते सव्वाशे कोटी रुपये खर्च होतात. परंतु यामध्ये सध्या कोणताही ताळमेळ नाही. प्रत्येक विभाग स्वतंत्र खरेदी करतो, त्यामुळे एकत्रित अशी माहिती मिळत नाही, एखाद्या विभागाने संगणक खरेदी केले तर त्याची गरज होती का, किती संगणकची गरज आहे, जुन्या संगणकाचे काय झाले, किती संगणक खरेदी केले, प्रत्यक्ष किती आले याची सर्व माहिती एकत्रितपणे या अ‍ॅपमुळे मिळणार आहे. यामुळे महापालिकेतील वस्तू खरेदीतील घोळ कमी होईल. - तुषार दौंडकर, उपायुक्त 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य