पुणे : शहरातील कोणत्याही रस्त्यावर गेल्यास ‘एंट्री’ आणि ‘विरुद्ध’ बाजुने येणारे वाहनचालक हमखास दृष्टीस पडतातच. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच असून गंभीर तसेच किरकोळ अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील अशा ५३ ठिकाणांची जंत्रीच तयार केली असून या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या २२ विभागांमधून ही ठिकाणे निवडण्यात आली आहेत. खडक वाहतूक विभागाच्या हद्दीतील शिवाजी रस्ता ते राष्ट्रभूषण चौक, मामलेदार कचेरी चौक ते फडगेट चौक या ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे. तर फरासखाना विभागांतर्गत पासोड्या विठोबा, विजय मारुती चौक, विश्रामबाग विभागांतर्गत मंदार लॉज ते अहिल्यादेवी शाळा, नागनाथ पार ते खजिना विहीर, समर्थ विभागांतर्गत रामोशी गेट ते भवानी माता मंदिर, अपोलो सिनेमा ते सोमवार पेठ पोलीस चौकी, डेक्कन विभागांतर्गत डेक्कन पीएमपी बसथांबा, कामत जंक्शन, फर्ग्यूसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार, हॉटेल रुपाली, कोथरुडला मोरे विद्यालय, एसबीआय चौक यांचा समावेश आहे. यासोबतच वारजे विभागातील सुवर्ण हॉटेल ते वारजे जंक्शन रस्ता, वनदेवी चौक ते वनाझ बस थांबा, धुमाळ चौक ते भाजी मंडई, ढोणे वाडा ते वारजे जंक्शन, वारजे चौक ते वारजे महामार्ग, चांदणी चौक ते वेध भक्त ही ठिकाणे अधिक संवेदनशील आहेत. दत्तवाडी विभागातील गणेश मळा, गोयल गंगा, धायरी फाटा, नवले ब्रीज ते सेवा रस्ता यांचाही समावेश आहे. सहकार नगरमधील महेश सोसायटी, चंद्रलोक, पुष्पमंगल, भारती विद्यापीठ विभागातील लोखंडी पुल ते धनकवडी फाटा, अभिनव महाविद्यालयासमोरील रस्ता, स्वारगेट येथील गगन गॅलेक्सी, लष्कर परिसरातील कोहिनूर हॉटेल ते मोहम्मद रफी चौकी, पुलगेट ते डॉ. आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन ते अलंकार या ठिकाणांवरही वाहनचालक विरुद्ध बाजुने येतात. कोरेगाव पार्क भागातील रेल्वे पुल ते नायडू रुग्णालय, सेंट मीरा ते दरोडे पथ, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे ते ब्ल्यू डायमंड हॉटेल, चतु:श्रृंगी विभागातील चतु:श्रृंगी मंदिर रस्ता ते महाबळेश्वर चौक, खडकी येथील बोपोडी चौक, येरवडा येथील गुंजन चौक ते पर्णकुटी, प्रतिक नगर ते सारस्वत बँक चौक, बिशप चौक ते रामवाडी चौक ही ठिकाणे आहेत. विमानतळ परिसरातील संजय पार्क ते दोराबजी चौक, सोमनाथ नगर चौक ते टाटा गार्ड रुम चौक, कोंढव्यातील लुल्लानगर चौकाशेजारील माऊंट कार्मेल शाळा, वानवडी येथील रामटेकडी, फातिमानगर, सोपानबाग, हडपसर परिसरातील मुंढवा नदी पूल, सिरम पंक्चर ते मांजरी फाटा, वेदवाडी चौक या ठिकाणांचाही समावेश आहे. ==== वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या या अहवालात केवळ शिवाजीनगर विभागातील एकही ठिकाण दर्शविण्यात आलेले नाही. वास्तविक शिवाजीनगरच्या अनेक भागांमध्ये विरुद्ध बाजुने येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. याठिकाणीही उपाययोजनांची आवश्यकता आहे.
‘नो एंट्री’ मध्ये घुसणाऱ्यांवर राहणार नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 13:02 IST
शहरातील कोणत्याही रस्त्यावर गेल्यास ‘एंट्री’ आणि ‘विरुद्ध’ बाजुने येणारे वाहनचालक हमखास दृष्टीस पडतातच.
‘नो एंट्री’ मध्ये घुसणाऱ्यांवर राहणार नजर
ठळक मुद्देवाहतूक पोलिसांकडून ५३ ठिकाणांची यादी तयारही समस्या दिवसेंदिवस वाढतच असून गंभीर तसेच किरकोळ अपघाताला निमंत्रण देणारी