पुणे : यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून बनावट नोटा बनविणाºया गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने जेरबंद केले आहे़ सोहेल सलीम शेख (वय २१, रा़ देहूरोड) असे त्याचे नाव आहे़ त्याच्याकडून २०० रुपयांच्या एकाच नंबरच्या ७ नोटा व प्रिंटर जप्त केला आहे़ गुन्हे शाखेकडील युनिट ४ मधील पोलीस कर्मचारी शंकर संपते यांना एक जण बनावट नोटा बनवून शहरात खपवत असल्याची माहिती मिळाली़ या माहितीनुसार पोलिसांनी नरपतगिरी चौकात सोहेल शेख याला पकडले़ त्याच्या देहूरोड येथील घरी जाऊन झडती घेतली असता तेथील कलर प्रिंटर जप्त केला़ शेख गेल्या १५ दिवसांपासून कलर प्रिंटरच्या सहाय्याने २०० रुपयांच्या बनावट नोटा बनवित होता़ या नोटा तो छोटी दुकाने चालविणाºया वृद्ध महिला, पान टपºया यांना देऊन त्यांच्याकडून चॉकलेट, बिस्किटे, सिगारेट खरेदी करीत असते़ यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून तो या बनावट नोटा बनवित असे़शंभर, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा त्याने तयार करण्याचा प्रयत्न केला़ पण, फक्त दोनशे रुपयांच्या नोटांचा रंग जुळत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करू लागला होता़
व्हिडिओ पाहून बनावट नोटा बनविणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 2:16 AM