कुरवली (ता. इंदापूर) येथील शिवशंकर पाणी वापर संस्था अंतर्गत कुरवली, चिखली, जांब या गावातील शेतीच्या पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन या संस्थांच्या माध्यमातून केले जाते. या गावातील कुरवलीसह चिखली व जांब गावातील सभासद शेतकऱ्यांना फाटा क्रमांक ३६ सदर मधून आवर्तनसाठी पाणी दिले जाते. सदरील गावे नीरा नदीलगत असल्यामुळे जांब व चिखली गावातील सभासद शेतकऱ्यांनी नीरा नदीवरील बांधण्यात आलेल्या बंधारा व लिफ्टची सोय झाल्यामुळे कॅनाॅलच्या पाण्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यानच्या काळात नदीतल्या क्षारयुक्त पाण्यामुळे शेत नापीक होण्याचे प्रमाण वाढले व शेतकऱ्यांना कॅनाॅलच्या पाण्याची गरज भासू लागली.
कॅनाॅलचे पाणी पूर्ववत सुरू राहावे यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक नेते व शासन दरबारी अर्ज-विनंत्या केल्या परंतु काही उपयोग झाला नाही. शिवशंकर पाणीवापर संस्था १३ वर्षांपासून सभासद शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठा सुरळीतपणे मिळावा यासाठी कार्यरत आहे.जांब व चिखली गावातील सभासद शेतकऱ्यांनी मागील ४२ वर्षांपासून या भागात शेतीसाठी कॅनाॅलचे पाणी उपलब्ध होत नव्हते. चिखली व जांब येथील १०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन शिवार हिरवेगार झाले आहे. याबाबत राज्यमंत्री भरणे मामा व शिवशंकर पाणीवापर संस्था चेअरमन विजयकुमार पांढरे सचिव चंद्रकांत चव्हाण आणि सर्व संचालक यांचे आभार व्यक्त केले.