बारामती : नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने बारामती शहराला फेब्रुवारी अखेरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.शुक्रवार दि. २२ जानेवारीपासून शहराच्या विविध भागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गुरुवारी २१ जानेवारीपासूनच काही भागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे विवेकानंदनगर, अवधूतनगर, वसंतनगर, ख्रिश्चन कॉलनी, सद्गुरूनगर, पतंगशानगर, महादेव मळा, श्रावण गल्ली, कोष्टी गल्ली, मारवाड पेठ, गोकुळवाडी, मेडद रोड, कसबा संपूर्ण भागात या दिवशी पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या दिवसापासून एक दिवसाआड पाणी मिळेल. शुक्रवारी २२ जानेवारीपासून सिनेमा रोड, कचेरी, पान गल्ली, सटवाजी सोनवणेनगर, नेवसे रोड, इंदापूर रोड, मार्केट यार्ड, आमराई, हंबीर बोळ, सिद्धेश्वर गल्ली, हरिकृपानगर, महावीर पथ, शंकर भोई तालीम परिसर, बुरुड गल्ली, साई गणेशनगर, मयूरेश्वर अपार्टमेंट, आनंदनगर, अशोकनगर, अकल्पित हाऊसिंग सोसायटी, विजयनगर, पोस्टरोड, तावरे बंगला, विश्राम सोसायटी, जवाहरनगर येथे पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
बारामती शहराला एक दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 1:18 AM