शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बारामतीत पाणीबाणी

By admin | Published: February 21, 2016 3:07 AM

टँकरच्या पाण्यासाठी रस्त्या-रस्त्यावर मांडलेले बॅरल... टँकरची प्रतीक्षा करणारे आबालवृृद्ध, तर सायकलला कॅन अडकवून दाहीदिशा फिरणारे तरुण... हे चित्र मराठवाडा किंवा विदर्भातील

बारामती : टँकरच्या पाण्यासाठी रस्त्या-रस्त्यावर मांडलेले बॅरल... टँकरची प्रतीक्षा करणारे आबालवृृद्ध, तर सायकलला कॅन अडकवून दाहीदिशा फिरणारे तरुण... हे चित्र मराठवाडा किंवा विदर्भातील नसून, बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील आहे. या भागात जणू काही पाणीबाणीच लागू झाली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग ४ वर्षांपासून हा भाग भयानक दुष्काळाच्या झळा सहन करीत आहे. मागील वर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे येथील खरीप तसेच रब्बी हंगाम पूर्णत: वाया गेले. मागील वर्षी याच महिन्यात जिरायती भागात २ टँकर सुरू होते. तर, या वर्षी तब्बल १८ टँकर सुरू आहेत. टँकरच्या या संख्येवरूनच जिरायती भागातील पाणीटंचाईचे गांभीर्य स्पष्ट होते. विहिरी, पाझर तलाव, विंधन विहिरी, हातपंप, पूर्णत: कोरडे पडले आहेत. ज्या विहिरींना पाणी आहे ते क्षारयुक्त असल्याने पिण्यास योग्य नाही. सध्या या भागात १८ टँकरद्वारे रोज ६४ खेपा होत आहेत. १७ गावे व १०८ वाड्या-वस्त्यांवरील ३८ हजार ५७२ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या मोराळवाडी, वाकी, कटफळ, गोजुबावी, निंबोडी, उंडवडी कडेपठार, उंडवडी सुपे, जराडवाडी, साबळेवाडी, सोनवडी, खराडेवाडी, कारखेल, देऊळगाव, नारोळी, कोळोली, दंडवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी शेरेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी या गावांसह परिसरातील १०८ वाड्यावस्त्यांवर टँकर सुरू आहे. तर भिलारवाडी, सायंबाचीवाडी, तरडोली, लोणी भापकर, मुढाळे, काऱ्हाटी वाड्यावस्त्या, गाडीखेल, मासाळवाडी, वढाणे वाड्यावस्त्या या गावांमध्ये टँकरची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी प्रस्तावित असल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)२०११-१२ पासून चारा छावण्यांपासून येथील वीज देयक थकीत आहे. सध्या ही रक्कम १६ ते १७ लाख रुपये आहे. पुरंदर आणि जनाई-शिरसाईच्या वीज देयकाची रक्कम टंचाईतून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, शासनाने हा प्रस्ताव अमान्य केला. त्यामुळे वीजबिल भरल्यानंतर पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा होईल. - व्ही. एन. लोंढे, कार्यकारी अभियंता, चासकमान