लोकमत न्यूज नेटवर्कचासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसेंदिवस वाढत्या तीव्र उन्हामुळे जलसाठ्यांची पाणीपातळी खालावत चालली आहे. परिसरात बोर, तसेच विहिरीची खोदाई करूनही पाणी मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची पायपीट वाढत आहे.खेड तालुक्यात उन्हाचा पारा ४० ते ४५ अंशांवर गेला आहे. यामुळे विहिरींनी तलाव, धरण यांनी तळ गाठला आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. शेतकरीवर्ग विहिरीची खोदाई करून विहिरींना जिवंत झरा मिळतो का? याचा शोध परिसरात नागरिक घेत आहे. काही काही ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळते. तर काही शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गात ‘कभी खुशी कभी गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा विहीर खोदाईवर केला जाणारा खर्च वाया जात आहे. तर काही ठिकाणी विहिरींना पाणी मिळेल, या आशेने शेतकरी वर्गाने परिसरात बागायती पिके घेतली आहे. परंतु विहीर खोदाई करूनही पाणी लागत नसल्यामुळे पिके पाण्यावाचून जळत आहेत. तर काही शेतकरी टँकरद्वारे शेतीला पाणी सोडून पिके वाचवण्यासाठी धडपड करत आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याचे चटके जाणू लागले. शेतातील उभी पिके जगविण्यासाठी शेतकरी कितीही खर्च करण्यासाठी तयार असतात. परंतु पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे.
खेडच्या पश्चिम भागातील जलसाठे आटले
By admin | Published: May 12, 2017 4:41 AM