शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अखेर महिन्यानंतर सोडले कालव्यातून पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 2:45 AM

कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

पुणे : कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याआभावी जळून चाललेल्या दौंड, इंदापूर, बारामती भागातील शेतकरी सुखावणार आहेत. धरणातून ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने पाणी वाढविले जाणार आहे.दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्याची घटना घडल्यामुळे खरीप हंगामासाठी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करावे लागले होते. तसेच कालव्यातील लाखो लिटर पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात घुसल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. तर महिनाभर कालव्यातील पाणी बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्याने पेरलेली पिके जळून गेली. त्यामुळे कालवा दुरूस्तीची कामे तत्काळ करून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात होती. अखेर रविवारी कालव्यातून सोडण्यात आले.जलसंपदा विभागाच्या कर्मचाºयांनी कालवा परिसरातील नागरिकांना कालव्यातून पाणी सोडल्याची कल्पना दिली. तसेच कोणीही कालव्यात उतरू नये, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे जसे पाणी पुढे जाईल, तसे जलसंपदा विभागाचे कर्मचारीही पाण्याबरोबर जात होते. दुरूस्ती केलेल्या ठिकाणी थांबून कालव्या बाहेर जाते का? याची पाहणी करत होते.लष्करसाठी पाणी उचलणारकालवा बंद असल्यामुळे लष्कर भागातील नागरिकांना पिण्यासाठी पालिकेला पाणी उचलता येत नव्हते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.परंतु, कालव्यात पाणी सोडल्यामुळे पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कालव्यातून २५० एमएलडी पाणी उचलले जाईल. सायंकाळी ६ वाजता ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडले असून रात्री दहा वाजता ५00 क्यूसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली. - मनीषा शेकटकर,लष्कर व होळकर जलशुद्धीकरण केंद्रधरणसाठ्यात अडीच टीएमसी पाणी कमीपावसाने पाठ फिरवल्याने खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल अडीच टीएमसी पाणीसाठा कमी आहे.त्यातच रविवारपासून कालव्यातून इंदापूरला शेतीसाठी विसर्ग सोडण्यात आल्यामुळे धरण साठ्यात आणखी घट होणार आहे.रविवारी खडकवासला धरणसाठ्यात २४.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला,पानशेत,टेमघर,वरसगाव या धरणसाखळीत सध्या ८४.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी ९२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.टेमघर धरणाच्या दुरूस्तीसाठी धरण रिकामे केले जात आहे.त्यामुळे धरणात ०.५७ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असून वरसगाव धरणात १२.७४,पानशेतमध्ये १०.४,तर खडकवासला धरणात १.२९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी धरणात २७.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.तर यंदा २८ आॅक्टोबर रोजी २४.६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकPuneपुणे