शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

Pune | पुणेकरांवरील पाणी कपात तूर्तास टळली; नवीन नळजोड देणे बंद

By निलेश राऊत | Published: April 18, 2023 6:57 PM

खडकवासला धरण साखळीत आजमितीला १२ टीएमसी पाणीसाठा आहे...

पुणे : जलसंपदा विभाग व महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारची पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी कपात तूर्तास टळली असली तरी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपातीसंदर्भात निर्णय हाेण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरण साखळीत आजमितीला १२ टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणांमधून शेतीकरीता उन्हाळी आवर्तन देण्यासाठी साधारणत: ५ टीएमसी पाण्याची गरज असून, पुणे शहराची तहान भागविण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाइी साधारणत: ७ टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. दरम्यान उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात हाेत असल्याने अंदाजे दोन टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा वापर जपून करावा. अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्या आहेत. अशी माहीती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जलवाहिनी दुरूस्तीचे काम ऑक्टोबर महिन्यानंतरखडकवासला ते पर्वती जलकेंद्र पर्यंत महापालिकेच्यावतीने २५ वर्षांपूर्वी बारा किलोमीटर अंतराची बंद जलवाहिनी टाकण्यात आली होती. या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गंज चढला असून, तीची काही ठिकाणी दुरूस्तीही करणे जरूरी आहे. याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली परंतु, या निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या जलवाहीनीचे काम सुरु केल्यानंतर महापालिकेला कालव्यातून प्रति दिन तीन हजार एमएलडी इतके पाणी उचलावे लागणार आहे. आजमितीला कालव्यातून पाणी साेडण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतल्यावर परीणाम होऊ शकतो. त्यामुळे या जलवाहीनीच्या दुरुस्ती, रंगरंगाेटीचे काम हे ऑक्टोबर महीन्यानंतर करण्यात यावे, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केल्या आहेत.

नवीन नळजोड देणे बंद

पाण्याची उपलब्धता व वाढते ऊण लक्षात घेता, पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी बांधकाम, वाहने धुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. बांधकामासाठी व वॉशिंग सेंटरवर पिण्याचा पाण्याचा वापर करण्याऐवजी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांचे नळजोड कापले जाणार आहेत. दरम्यान उन्हाळ्याच्या पुढील दीड महिन्याच्या काळात नवे नळजोड दिले जाणार नसल्याचे अनिरूध्द पावसकर यांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातPuneपुणे