शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कोसभरावर पाणी; तरी घसा कोरडाच

By admin | Published: September 06, 2015 3:26 AM

एका बाजूला वर्षातून बारा महिने ओसंडून वाहणारा नीरा डावा कालवा आणि दुसऱ्या बाजूला याच कालव्यापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर पाण्यासाठी टँकरची वाट पाहणारी कासावीस

- सुनील राऊत, बारामतीएका बाजूला वर्षातून बारा महिने ओसंडून वाहणारा नीरा डावा कालवा आणि दुसऱ्या बाजूला याच कालव्यापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर पाण्यासाठी टँकरची वाट पाहणारी कासावीस माणसे, असे विदारक चित्र बारामती तालुक्याच्या पश्चिमेकडील २२ गावांमध्ये दुष्काळामुळे पुन्हा दिसू लागले आहे. विशेष म्हणजे ही सर्व गावे वर्षभर केवळ उसासाठी भरून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यापासून अवघ्या १० ते २० किलोमीटरच्या परिघात आहेत. मात्र, त्यांना या कालव्यातील एक थेंबही पाणी मिळत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.प्रत्येक लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही पाणी समस्या निवडून येताच तातडीने सोडविण्याची आश्वासने देण्यात आली. मात्र, या गावांच्या तीन पिढ्या घोटभर पाण्याची वाट पाहतच संपल्या. परिणामी हे ऊस जगविणारे पाणी, माणूस जगविण्यासाठी का नाही, असा जीवघेणा आक्रोश या भागातील नागरिक करीत आहेत. बारामती तालुक्याच्या पश्चिम दिशेला असलेली ही गावे एकाच परिघात आहेत. त्यातील चार ते पाच गावेच कालव्यापासून १८ किलोमीटरवरच्या अंतरावर आहेत. या २२ गावांची लोकसंख्या जेमतेम ४० ते ४५ हजार असून प्रतिमाणशी प्रतिदिन ३०० लिटर पाणी त्यांना पिण्यासाठी दिल्यास दरदिवशी १२ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच वर्षभरासाठी ४३८ लिटर म्हणजेच अवघे ०.०१५ टीएमसी पाणी गावांची तहान भागवू शकते. विशेष म्हणजे, या गावांपासून १५ किलोमीटरच्या परिघातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यातून दरवर्षी तब्बल १४ टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले जाते; तर या पाण्याचे बाष्पीभवन आणि गळती सुमारे ३ ते ४ टीएमसी आहे. म्हणजे या गळतीच्या पाण्याचे प्रमाण पाहता नुसत्या गळतीचे पाणीही या गावांसाठी किमान २० वर्षे पुरेल एवढे आहे. नीरा कालव्यातून पाणी का नाही ? नीरा डावा कालवा हा ब्रिटिशकालीन आहे. वीर धरणातून या कालव्यासाठी पाणी सोडले जाते. या कालव्याच्या स्थापनेपासून हा कालवा शेतीसाठीच आहे. तर काही ठिकाणी या कालव्याच्या पाण्यावर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही सक्रिय आहे. ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी दिल्यास काही सिंचन क्षेत्र निश्चित कमी होणार आहे. मात्र, त्याचे प्रमाण ०.०१ टक्क्यापेक्षाही कमी असणार आहे; तर दुसरीकडे हे पाणी वितरिकेद्वारे दिल्यास त्याची चोरी होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्षात हे पाणी गावांना जॅकवेल अथवा कालव्यापासून ५ किलोमीटरच्या परिघात असलेल्या एखाद्या गावात साठवण तलाव करून त्यानंतर पुढे देणे सहज शक्य आहे.हे शक्य असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारीही खासगीत बोलताना सांगतात. तसेच, हा तोडगा व्यवहार्य असल्याचेही कबूल करतात. त्यानुसार, जोगवडी हे गाव कालव्यापासून अवघे ४ किलोमीटर आहे. त्या ठिकाणी साठवण तलाव केल्यास आणि त्या ठिकाणच्या टेकडीवर टाकी बांधून या गावांसाठी पाणीपुरवठा केल्यास तो सहज शक्य असल्याचे अधिकारी मान्य करतात. याशिवाय पळशी येथेही मोठा तलाव असून त्या ठिकाणाहूनही पाणी या गावांना उपसा सिंचन योजना करून पुरविणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा मोठा प्रश्न आहे.जवळच्या जलस्रोताचे काय ? पुरंदर उपसा योजनेचे शेतीसाठी देण्यात येणार आहे. हे पाणी बारामती तालुक्यातील जोगवडी येथे आणून तेथून अन्य गावांना वितरित करण्याची योजना आहे. लोकसभा निवडणुकीत पाण्याचा राजकीय मुद्दा झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काही काही महिने अगोदर युद्धपातळीवर ६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पवारवाडीच्या तलावात गाजावाजा करीत पाणी सोडले. त्यानंतर या तलावात पाण्याचा थेंब आलेला नाही. जवळचे मार्ग सोडून अडचणीतून पुरंदर योजना कार्यान्वित केली. त्याचा फारसा उपयोग होत नाही. पाण्यासाठी मोरगाव प्रादेशिक योजनेवरदेखील कोट्यवधीचा खर्च होत असताना जवळील जलस्रोताचा विचार का होत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे़त्या गावांना पाणी देणे शक्य नाही : शरद पवार बारामती तालुक्यातील जिरायत भागामधील या २२ गावांतील गावकऱ्यांनी मागणी करुनही त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यास गेल्या अनेक वर्षांपासून शक्य झाले नाही़ येथील गावकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बारामती तालुक्यातील २२ गावांना पाणी देणे अजूनही शक्य झाले नसल्याचे विचारले असता ते म्हणाले, सगळीकडे पाणी जात नाही़ उंचावर असल्याने तेथे पाणी देणे शक्य होत नाही़ लिफ्टनेही मर्यादित पाणी जाते़ बारामतीतील या गावांसह अनेक ठिकाणी हा प्रश्न आहे़ नीरा नदीतून अब्जावधी लिटर पाणी वायायंदाचा अपवाद वगळता नीरा नदीत धरणात जास्त झालेले पाणी सोडून दिले जाते. हे पाणी अक्षरश: वाया जाते. जवळपास २ ते ३ वेळा धरणे भरतील इतके पाणी सोडून दिले जाते. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांबळेश्वरला छोटे धरण बांधण्याचे नियोजन होते.पुढे तावशी (ता. इंदापूर) येथे नीरा नदीवरच असेच नियोजन होते. या छोट्या धरणात दोन ते तीन टीएमसी पाणी अडविण्याची क्षमता असेल, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात ही योजना अमलात आली नाही. नीरा नदीत धरणाचे सोडलेले जादा पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत वळवणे अथवा जिरायती भागात मोठा तलाव करून सोडणेदेखील शक्य आहे. नीरा नदीपासून जिरायती भागातील गाव २२ ते २३ किलोमीटर अंतरावर आहे.