नदीकाठच्या राहू, पिंपळगाव, देलवडी, वाळकी, पारगाव, नागरगाव, नानगाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटा, हातवळण या गावातील लोकांचे व पशूंचे आरोग्य धोक्यात आले आहे. सायंकाळी गुरांची दूध काढायची असल्यास संबंधित गोपालकास गुरांच्या कडेने कृत्रिम धूर करावा लागतो. कारण डासांमुळे जनावरे एका ठिकाणी उभी रहात नाहीत. पांढऱ्या डासांमुळे जर्सी गाय अंगावरती जखम झालेल्या आहेत. जखमेवरती अद्याप लस मिळत नसल्याची माहिती गोपालक महेश शेलार यांनी दिली आहे. तसेच या भीमा मुळा-मुठा नदीवरती जलपर्णीच्या थर असल्यामुळे मच्छीमारांचा व्यवसाय बंद पडला आहे. त्यामुळे अनेक मच्छीमार कुटुंबांनी पर्यायी व्यवसाय शोधला आहे. सध्या आधीच ग्रामस्थ कोविडमुळे त्रस्त होऊन धास्तावलेले आहेत त्यांना डासांमुळे डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजार उद्भवू नये यासाठी आरोग्य विभाग व संबंधित गावची ग्रामपंचायत यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
१७ केडगाव जलपर्णी
संगम येथे भीमा नदीवरती साचलेला जलपर्णीचा थर.