पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळविभागात सर्वच फळांची आवक वाढली आहे. मागणी वाढल्याने कलिंगड, खरबुजाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. यात कलिंगडाचे दर किलोमागे २ रुपयांनी तर खरबुजाचे दर किलोमागे ५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर पपई आणि संत्र्यांची आवक वाढल्याने दरामध्ये घट झाली आहे. अन्य सर्व फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डमधील फळबाजारात रविवार (दि.५) रोजी केरळ येथून अननस ५ ट्रक, मोसंबी ५० टन, संत्री ८ ते १० टन, डाळिंब २०० ते २२५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे सहा ते सात हजार गोणी, कलिंगड १५ ते २० टेम्पो, सफरचंद ३ ते ४ हजार बॉक्स, सिताफळ ३ ते साडे तीन टन, तीन हजार पोती, खरबुजाची ५ ते ६ टेम्पो इतकी आवक झाल्याचे व्यापाºयांनीसांगितले. बाजारात लिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक दिवसांपासून लिंबाचे दर घसरले आहेत. तर चांगल्या दर्जाच्या लिंबाच्या दरात गोणीमागे १० ते २० रूपयांनी वाढ झाली आहे.फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ८०-१२०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १००-२५०, (४ डझन) : ४०-९०, संत्रा : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन) : ८०-१३०, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : २०-७०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१५, खरबुज : १०-२०, पपई : ३-१५, सिताफळ : २०-१२५, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) १०००-१४००, अमेरिकन डेलिशिअस ११००-१३००, महाराजा ७००-९००. बोरे (१० किलो) : चेकनट : ३८०-४००, उमराण : २०-४०, चमेली : ६०-१००, चण्यामण्या : ३००-३५०. स्ट्रॉबेरी (२ किलो) ७०-१७० इतका भाव मिळाला.--फुलांच्या उत्पादनावर थंडीचा परिणामथंडीमुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम होत असून, लिली, गुलछडीच्या फुलांना सर्वांधिक फटका बसला आहे. यामुळे फुलांचा दर्जा खालवला असून, मागणी देखील कामी आहे. सणासुदीचे दिवस कमी असल्याने फुलांना अपेक्षित मागणी देखील नाही. यामुळे मार्केट यार्डात फुलांचे दर २० टक्क्यांनी घटले आहेत.
कलिंगड, खरबूजचे दर वाढले; पपई, संत्रीचे दर उतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 3:41 PM
सर्वच फळांची आवक वाढली : लिंबाचे दर घसरले
ठळक मुद्देअन्य सर्व फळांचे दर स्थिर असल्याची माहिती