शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुणे शहरात पोलीस संरक्षणात पालिका बसविणार पाणी मीटर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:17 AM

अनेक नागरिकांनी पाणी मीटर बसविण्यास विरोध केला...

ठळक मुद्देपाणीपुरवठा विभागाची माहितीपुणे महापालिकेच्या वतीने शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू संपूर्ण शहरात या योजनेअंतर्गत ३ लाख १७ हजार पाणी मीटर बसविण्यात येणार

पुणे : शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बसवलेले पाणी मीटर काही व्यावसायिक व नागरिकांकडून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला़. यामुळे पालिका प्रशासनाकडून काढलेले हे ३०० पाणी मीटर पुन्हा तेही पोलीस संरक्षणात बसविणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.पुणे महापालिकेच्या वतीने शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे़. याद्वारे नागरिकांना मुबलक व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याचा मानस असून, या योजनेसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू असून, पाण्याची गळती रोखण्यासाठी शहरातील जुनी पाईपलाईन बदलून, १,८००  किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकली जाईल.  तसेच, नवीन १०३ पाण्याच्या टाक्याही बांधण्यात येतील. यापैकी पहिल्या टप्प्यात ८२ टाक्या उभारल्या जातील़. याबाबत माहिती देताना कुलकर्णी म्हणाले, की या योजनेअंंतर्गत संपूर्ण शहरात मीटरने पाणीपुरवठा करणार आहे. याकरिता पाणी मीटर बसविण्याचे कामसुद्धा करण्यात येत आहे. परंतु, गेल्या महिन्यामध्ये ठेकदाराकडून बसवलेले ३०० मीटर काही नागरिकांकडून तसेच व्यावसायिकांकडून काढून टाकल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे आता हे मीटर पोलीस संरक्षणात बसवण्यात येणार आहेत.संपूर्ण शहरात या योजनेअंतर्गत ३ लाख १७ हजार पाणी मीटर बसविण्यात येतील. यात पहिल्या टप्प्यात कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर, खराडी, कात्रज, वडगाव बुद्रुक आदी भागांत १२ हजार मीटर बसविण्याचे उद्दिष्ट होते. यातील ७ हजार मीटर धानोरी, कळस, विमाननगरमध्ये बसविणार होते. मात्र, नागरिकांकडून ते बसविण्यास विरोध होत असल्याने केवळ ३,५०० मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.........अनेक नागरिकांनी पाणी मीटर बसविण्यास विरोध केला. असून, मुबलक पाणी मिळत नसताना मीटर नको, अशी भूमिका नागरिकांनी व काही माननीयांनी घेतली आहे. अनेक नागरिकांनी बसवलेले मीटर काढून घरात ठेवले आहेत. याशिवाय, मीटरला बायपास करून नळजोडणी केली आहे. या पार्श्वभूमीवरस महापालिका नियमावलीतील तरतुदीनुसार पाणी मीटरसंबंधीचे धोरण तयार करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी