शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

पाणी हमारा जीवन हैै, इसे क्यंू अपने हातों से खत्म करे!

By admin | Published: December 30, 2016 4:27 AM

नैनीताल जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ...येथील सरोवर, निसर्ग, हिमालयाच्या पर्वतरांगा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू.. मात्र, या तलावाला आता ग्लोबल वॉर्मिंग आणि पाण्याचा

बारामती : नैनीताल जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ...येथील सरोवर, निसर्ग, हिमालयाच्या पर्वतरांगा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू.. मात्र, या तलावाला आता ग्लोबल वॉर्मिंग आणि पाण्याचा बेसुमार उपसा यांमुळे फटका बसू लागला आहे. यावर बारामती येथे भरलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये उत्तराखंड राज्यातील स्मृती पांडे या अवघ्या ११ वर्षांच्या मुलीने संशोधनपर अहवाल सादर केला. पाणीबचतीचे आवाहन करताना ‘पाणी हमारा जीवन हैै, तो हम क्यूं अपने हातों से अपनाही जीवन खत्म कर रहे हैै’ असे आवाहनही स्मृती करते. स्मृतीच्या या संशोधन अहवालाचे सर्वांनीच कौतुक केले. तसेच पाणीबचतीचे महत्त्व ही काळाची गरज असल्याची जाणीवही या निमित्ताने साऱ्यांना झाली. भूजलाच्या अतिरिक्त उपशामुळे मागील उन्हाळ्यात नैनीताल सरोवराची पाणीपातळी प्रचंड खालावली. वजा पाच फुटांपर्यंत पाणीपातळी खालावल्याने येथील निसर्गतज्ज्ञ, पर्यावरणवादी यांच्यातून चिंता व्यक्त होऊ लागली. नेमका हाच विषय डोळ्यांसमोर ठेवत स्मृती आणि तिच्या सहकाऱ्यांनी यावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिच्या शिक्षकांनी तिला मार्गदर्शन केले. नैनीताल शहरामध्ये दररोज १.५ मिलियन भूजलाचा उपसा होत आहे. या अतिरिक्त भूजल उपशामुळे नैनीताल सरोवराची पाणीपातळी घटत असल्याचेही समोर आले. तसेच पृथ्वीचे वाढते तापमान, कमी झालेला पाऊसकाळ यामुळे भूजलपातळीही प्रचंड प्रमाणात खालावत आहे. याचा परिणाम म्हणून दरवर्षी मे महिन्यामध्ये साधारण पाणीपातळीपेक्षा १२ फुटाने सरोवराची पाणीपातळी खालावते. मात्र, मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ही पातळी १७ फुटाने खालावली. म्हणजेच वजा ५ फुटाने पाणीपातळी खालावल्याचा निष्कर्ष स्मृती आणि तिच्या सहकाऱ्यांनी काढला. केवळ अहवाल तयार करण्यापुरतेच ही बच्चेकंपनी थांबली नाही, तर त्यांनी हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ अबाधीत राहावे, त्याचे सौंदर्य चिरकाळ टिकावे यासाठी ‘पाणी बचाव लोकअभियान’ सुरू केले. पर्यावरणासंबंधी संवेदनशीलपणे विचार करणाऱ्यांना जमवून पाणीबचतीचे संदेश देण्यासाठी हे बालवैज्ञानिक सरसावले आहेत. उत्तराखंड राज्यातून १६ बालवैज्ञानिकांसह राज्य पथकप्रमुख कमला पंत, प्रभारी निर्मल रावत, शिक्षक हिमांशू पांडे, डॉ. बी. सी. पांडे, एस. एस. मेहरा, मंजुला पांडे आदी बारामती येथील राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेला उपस्थित राहिले आहेत.- स्मृती सांगते की, आम्ही पाणी वापरासबंधी समाजाचा आर्थिक स्तर तपासला. यामध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले. ज्यांचा आर्थिक स्तर चांगला आहे अशा व्यक्तींकडे पाण्याचे स्रोत आहेत. यामध्ये प्रमुख्याने बोअरवेलचा समावेश आहे. या व्यक्ती दिवसाला १ हजार ५०० लिटर पाणी वाया घालवतात, तर आर्थिक स्तर कमी असणाऱ्या व्यक्ती आणि ज्यांच्याकडे पाण्याचे स्वमालकीचे स्रोत नाहीत अशांना दिवसाला फक्त १५० ते २०० लिटरच पाणी पुरते. हे चित्र थांबायाला हवे. पाण्याचा पूनर्वापर होणे गरजेचे आहे, असेही यावेळी स्मृती पांडे हिने सांगितले.