राजगुरुनगर : राजगुरुनगरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेने चालू असलेल्या रिलायन्स कंपनीच्या केबलसाठी खोदाईचे काम करताना राजगुरुनगरच्या थिगळस्थळ-पडाळवाडी भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. पुणे-नाशिक महामार्गालगत रिलायन्स कंपनीच्या केबलचे खोदकाम चालू आहे. ते चालू असताना रविवारी दु.२ च्या सुमारास एकवीरादेवीच्या मंदिरासमोरची शहराच्या थिगळस्थळ-पडाळवाडी भागाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली. त्यामुळे जोरदार पाण्याचे फवारे उडू लागले. सुमारे ३० फुटांपर्यंत वर फवारे उडत होते. नागरिकांनी ताबडतोब याबाबत नगर परिषदेला कळविले. मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे तेथे हजर झाले. नगर परिषदेच्या लोकांनी पाणीपुरवठा बंद केल्याने पुढील नुकसान टळले.
पाण्याची पाईपलाईन फुटली
By admin | Published: May 09, 2016 12:42 AM