पुणे: दोन महत्वाच्या विषयांवर खास आयोजित केलेली सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्यामागेही समान पाणी योजनेवरून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात सुरू असलेला शह काटशहच असल्याचे बोलले जात आहे. त्याला आता महापालिकेतील तिसºया अतिरिक्त आयुक्त पदाची फोडणी मिळाली आहे, असे समजते.गुरुवारच्या सभेतील दोन्ही विषय आयुक्त कुणाल कुमार यांचेच होते. ते व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतील एक वरिष्ठ पदाधिकारी यांच्यात दुसºयाच विषयावरून निर्माण झालेल्या विसंवादावरून आजची सभा तहकूब करून भाजपाने आयुक्तांना धडा शिकवला असल्याचे बोलले जात आहे. २४ तास पाणी योजनेचे काम मिळवण्यासंबधी एका ज्येष्ठ सदस्याने सत्ताधाºयांचे स्थानिक ठेकेदार कंपन्यांबरोबर संधान बांधून दिले असल्याची चर्चा आहे. त्यातूनच आयुक्त व पदाधिकारी यांच्यातील संघर्ष उद््भवला असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारचे योजनेच्या निविदा प्रक्रियेवर लक्ष आहे असे स्पष्ट केल्यानंतरही स्थानिक कंपन्यांची आग्रह सुरूच ठेवण्यात आला व लक्ष आहे ते प्रशासनाने चुकीचे काही करू नये म्हणून आहे, असे सांगण्यात आले.या महत्त्वाच्या विषयाबरोबरच महापालिकेतील एका अतिरिक्त आयुक्तांचे अधिकार कमी करणे व रिक्त असलेल्या तिसºया पदावर एका स्थानिक अधिकाºयाची नियुक्ती करणे, असे दोन विषय प्रशासनापुढे मांडण्यात आले होते. मात्र या दोन्ही विषयांबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते, तुम्ही त्यांच्याकडून या नियुक्त्या करून आणाव्यात, प्रशासनाची काही हरकत नाही, असे याबाबत आग्रही असलेल्या पदाधिकाºयाला सांगण्यात आले. त्यावरूनही वाद निर्माण झाला. तुम्ही आमचे ऐकत नाही तर आम्ही तरी तुमचे का ऐकावे, अशी शाब्दिक चकमक उडून त्याचे पर्यवसन सभा अचानक तहकूब होण्यात झाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तुम्ही सत्ताधारी आहात, ९८ नगरसेवकांचे संख्याबळ तुमच्याकडे आहे, तरीही प्रशासन तुमचे ऐकत नसेल तर त्यांना तुमची ताकद दाखवण्याची ही संधी आहे अशी हवा विरोधी पक्षातील एका नगरसेवकाकडून सत्तेतील एका पदाधिकाºयाला देण्यात आली. त्यामुळेच सायकल शेअरिंग व घनकचरा विभागासाठीचे नवीन नियम मान्य करणे या दोन महत्त्वाच्या विषयावर संक्रात आली. ही सभा अचानक तहकूब करण्यात आली. आती ही सभा १४ डिसेंबरला आयोजित केली आहे.संरक्षण पुरवण्याची मागणी करणार होते४भाजपा नगरसेविकेच्या एका पतीने महापालिका अभियंत्याला दिलेल्या धमकीचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे योगेश ससाणे व भैया जाधव सभेसाठी कमांडो गणवेशात आले होेते. त्यांनी सभागृहात प्रवेश करण्याआधीच सभा तहकूबही झाली होती. ही भाजपाची मनमानी असल्याची टीका त्यांनी केली. भाजपाच्या राज्यात अधिकाºयांना संरक्षण पुरवावे, अशी मागणी ते करणार होते.सभा तहकूबीबाबत प्रशासन, विरोधातील व सत्तेतीलही काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सभेची तयारी करण्यासाठी कार्यालयीन कामकाज थांबवून अधिकारी येत असतात. त्यासाठी प्रत्येक खातेप्रमुख त्याच्या विषयांचा अभ्यास करत असतो.अचानक सभा तहकूब केल्यामुळे कामाचे कित्येक तास वाया जातात, असे एका अधिकाºयाने सांगितले. सभा तहकूबच करायची होती तर आम्हाला आधी कळवायचे, इतक्या लांबून आलोच नसतो, असे मत उपनगरांमधील काही नगरसेवकांनी व्यक्त केले.
तहकुबीमागे पाणी योजना? अतिरिक्त आयुक्तांवर राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:53 AM