पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मोठ्या क्षमतेच्या टाक्या बांधण्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरपासून शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व भागांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल. त्यामुळे पाण्याची समस्या सुटेल असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.शिवाजीनगर मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिरोळे म्हणाले, गेली दोन वर्षे यासंदर्भातील विकास कामांचा पाठपुरावा केल्यानंतर, आता त्याला चांगले स्वरुप येऊ लागले आहे.पाणीपुरवठ्याच्या अकरापैकी दहा झोनमधील कामे ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत. विशेषतः सात ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या टाक्या बांधण्यात येत असल्याने पाणी पुरवठ्याचा दाब वाढणार आहे. येत्या ऑगस्टपर्यंत टाकी बांधण्याचे, तसेच काही ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा फायदा शिवाजीनगर मतदारसंघातील सर्वच भागातील नागरिकांना होणार आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातील पाणी समस्या लवकरच सुटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:40 IST