शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

धरणातून पाण्याचा विसर्ग, पुण्यात पुन्हा पूर; नागरिक सुरक्षितस्थळी, प्रशासन अलर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 9:13 PM

अग्निशमन दलाकडून पुरपरिस्थिती निर्माण होणारया ठिकाणी मेगाफोन्सद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या.

पुणे - राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.  पुणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून सायंकाळी पाच वाजता ४५ हजार क्युसेकने विसर्ग वाढविला असल्याने आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दल अलर्ट मोडवर होते.

पाण्याची पातळी वाढत असल्याने पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सिंहगड रस्ता एकता नगरी येथे मेगाफोन्स वापरत विसर्गाबाबत पूर्वसूचना देण्यात येत होत्या. त्याचबरोबर त्याठिकाणी तीन बोटी ही दाखल करण्यात आल्या होत्या. निंबोज नगर येथे ही दलाचे जवान कार्यरत होते. या सर्व घटनेत टॉर्च, रश्शी, मेगाफोन्स, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, बोटी याचा वापर होत आहे. तसेच दत्तवाडी घाट, भिडे पूल, पुलाची वाडी, विश्रांतवाडी टँक रोड, आदर्शनगर, शांतीनगर, ताडीवाला रोड, शिवाजीनगर पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर अशा विविध भागात दलाचे जवान कार्यरत होते. दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 

एकता नगरी ३५ व निंबोज नगर २५ तर येरवडा आदर्शनगर व शांतीनगर येथून पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सुमारे १०० नागरिक अशा एकुण सुमारे १६० जणांना आत्तापर्यंत अग्निशमन दलाने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शहर परिसरात १५ झाडपडीच्या घटना (निलायम थिएटर, सादलबाबा चौक, वाकडेवाडी, भांडारकर रोड, गणेश पेठ, अरणेश्वर मंदिर, संगमवाडी रोड, लुल्लानगर, गोखलेनगर, बाणेर रोड, ससून रोड, खडकी, पाषाण, लॉ कॉलेज रोड, कोरेगांव पार्क) येथे घडल्या असून काही ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर वाहने काढली असून रस्ता मोकळा करुन दिला आहे. यामध्ये जखमी कोणी नाही.

"अग्निशमन दलाकडून पुरपरिस्थिती निर्माण होणारया ठिकाणी मेगाफोन्सद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. आमचे माझ्यासह २० अधिकारी व जवळपास ३०० जवान विविध ठिकाणी कार्यरत आहोत." - देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका.

सध्याची स्थिती

- नायडू अग्निशमन केंद्र - अधिकारी विजय भिलारे - बर्निंग घाट/ताडीवाला रोड - परिस्थिती नियंञणात

- काळे बोराटे नगर अग्निशमन केंद्र - अधिकारी अनिल गायकवाड - पाटील इस्टेट झोपडपट्टी - परिस्थिती नियंञणात 

- नवले अग्निशमन केंद्र - अधिकारी प्रकाश गोरे - निम्मज नगर - परिस्थिती नियंञणात 

- जनता अग्निशमन केंद्र - अधिकारी प्रदिप खेडेकर - दत्तवाडी घाट - परिस्थिती नियंञणात 

- वारजे अग्निशमन केंद्र - अधिकारी सचिन मांडवकर - तपोधाम वारजे - परिस्थिती नियंञणात 

- येरवडा अग्निशमन केंद्र - अधिकारी सुभाष जाधव - शांतीनगर/आदर्शनगर - परिस्थिती नियंञणात 

- कसबा अग्निशमन केंद्र - अधिकारी कमलेश चौधरी - भिडे पुल - परिस्थिती नियंञणात 

- एंडरवणा अग्निशमन केंद्र - अधिकारी राजेश जगताप - पुलाची वाडी/रजपुत वीटभट्टी - परिस्थितीत नियंञणात 

- सिहंगड अग्निशमन केंद्र - अधिकारी प्रभाकर उम्राटकर - एकता नगरी - परिस्थिती नियंञणात

- पीएमआरडीए अग्निशमन दल - अधिकारी विजय महाजन -  एकता नगरी व विश्रांतवाडी याठिकाणी कार्यरत

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर