शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 5:27 PM

जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी पुन्हा एकदा बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाइप लाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी थांबवले आहे.

पुणे: जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी पुन्हा एकदा बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेच्या पर्वती केंद्राला बंद पाइप लाइनमधून सोडले जाणारे 250 एमएलडी पाणी थांबवले आहे. वारंवार सूचना देऊन व पत्रव्यवहार करूनही पालिकेकडून पाण्याचा वापर कमी केला जात नसल्याने पालिकेचे दोन पंप जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बंद केले आहेत. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यासह पुणे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे .गेल्या काही दिवसांपासून पालिका व जलसंपदा विभागात पाणी वितरणावरून वाद सुरू आहे. हा वाद प्राधिकरणापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला. खडकवासला धरण प्रकल्पात पाणीसाठा कमी असल्याने शेतीला व पिण्यासाठी 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने वारंवार पालिकेच्या अधिकाऱ्यांना धरणातून नियमानुसार पाणी उचलावे, अशा सूचना दिल्या होत्या मात्र, त्यात बदल झाला नाही.

पालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही पालिकेकडून पाणी कपात केली जात नव्हती ; उलट पाण्याचा वापर जास्तच केला जात असल्याचे दिसून आले. बुधवारी पालिकेने 1402 एमएलडी पाणी घेतले. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार पालिकेने 892 एमएलडी पाणी उचलणे अपेक्षित आहे .परंतु ,पाण्याचा वापर जास्त होत असल्याने जलसंपदा विभागाने पंप बंद करण्याची कार्यवाही केली.

येत्या 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेतला पंपाद्वारे पाइपलाइनच्या माध्यमातून पर्वती केंद्राला दिले जाणारे 250 एमएलडी पाणी बुधवारी दुपारी 3 वाजता थांबविले आहे.-पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता खडकवासला धरण प्रकल्प,

टॅग्स :WaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे