पुणे : जलसंपदाने पालिकेला २०३२ सालापर्यंत नेमके किती पाणी लागणार आहे याची विचारणा केली असून त्यानुसार नविन प्रस्ताव तयार करुन पाठविण्यास सांगितले आहे. त्यानुसार पालिकेने नवीन प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर करुन घेण्यासंदर्भात दोन्ही विभागांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी दिली. महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये झालेला करार फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात आला असून हा करार सहा महिन्यांसाठी वाढवून घेण्यात आला आहे. पालिकेने वाढीव पाणीकोटा मागणारा प्रस्ताव जलसंपदा विभागाला दिला होता. पुण्याची लोकसंख्या ५२ लाखांच्या घरात असून शहराला सुधारित करार करुन प्रतिदिन १३३४.५० प्रमाणे (वार्षिक १७ टीएमसी) पाणी देण्याची मागणी पालिकेने पत्राद्वारे केली होती. त्यासाठी लोकसंख्येने ५० लाखांचा टप्पा पार केल्याचे पुरावे जलसंपदाने मागितले होते. पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लोकसंख्येबाबत विचारणा केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला आधारकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार जिल्हा मतदान विभाग, आधार नोंदणी कार्यालय, आरोग्य विभागासह लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या शासकीय यंत्रणांकडून माहिती मागविण्यात आली. या माहितीच्या आधारे निश्चित केलेल्या लोकसंख्येनुसार वाढीव पाणी कोट्याची मागणी करण्यात आली होती.पाणी वापराच्या ठरविण्यात आलेल्या मानकांनुसार ५० लाख लोकसंख्या असलेल्या शहराला १३५ लिटर पाणी प्रतिव्यक्ती देणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेचा पाणी वापर दुप्पट आहे. त्यामुळे महापालिकेने वषार्ला ८.१९ टीएमसी पाणी घेण्याचे आदेश जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने लोकसंख्येच्या आधारावर दिले होते. शहराची लोकसंख्या ४८ लाख गृहीत धरुन ११.५० टीएमसी पाणी कोटा प्रतिवर्षी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे.=====महापालिकेने जलसंपदा विभागाला फेब्रुवारीमध्ये पाठविलेल्या पत्रामध्ये शहराला सध्या दर दिवसाला १३३४.५० एलएलडी (वार्षिक १७ टीएमसी) पाणी आवश्यक असून नवीन करार करताना, खडकवासला धरणसाखळी व भामा-आसखेड धरण असा एकत्रितरित्या १७ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा अशी मागणी पालिकेने या पत्रामध्ये केली होती. परंतु, जलसंपदाकडून पालिकेला २०३२ सालापर्यंत पालिकेची पाण्याची आवश्यकता किती असणार आहे, याची माहिती विचारण्यात आली. त्यानुसार, नविन प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. =====
आधार नोंदणी 36 लाख 59 हजार, आधार नोंदणी राहिलेले 3 लाख 66 हजार, 5 वर्षे आणि त्या खालील मुले 4 लाख 80 हजार पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड लोकसंख्या (2011 नुसार) 72 हजार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड 79 हजार पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालये 82 हजार 527 स्वायत्त महाविद्यालये 15 हजार विद्यार्थी आश्रम, मठ, अनाथालय 1452 मुले शाळा, हॉस्टेल 2 हजार शासकीय निवासी वसाहती 2 लाख 22 हजार वसतिगृहे 24 हजार 604 दरवर्षी शहरात नागरिकांचेहोणारे स्थलांतर (5 टक्के) 2 लाख 50 हजार