शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

पुण्यात पाणीप्रश्न गंभीर, पाणीकपातीसाठी जलसंपदा सचिवांनाच साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 12:41 AM

दोन विभागांत जुंपली : पुणे महापालिकेला आदेश देण्याची पत्राद्वारे केली विनंती

पुणे : जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश देऊनही पुणे महापालिकेने अद्याप पाणीकपातीला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागाला सिंचन व पाण्यासाठी उन्हाळी हंगामात नियोजित असलेले एकमेव आवर्तन देता येणे शक्य होणार आही. तसेच पालिकेच्या अधिकच्या पाणीवापरामुळे हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यात सिंचनासाठी पाणी अपुरे पडत असल्याने शासनाने पालिकेला प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच पाणीवापर करण्याच्या सूचना द्याव्यात, असे पत्र अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना पाठविले आहे. मात्र, हा विषय महामंडळाच्या अखत्यारीत असून अधीक्षक अभियंत्यांनी थेट सचिवांना पत्र लिहिले असल्यास त्याची दखल घेतली जाणार नसल्याचे उपसचिव अ. अ. कपोले यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या पत्रामुळे पालिका आणि जलसंपदा विभागात जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.

पुणे महानगरपालिकेला खडकवासला प्रकल्पामधून ३२५.४५ दलघमी (११.५० टीएमसी) पाणी आरक्षण शासनाच्या उच्चाधिकार समितीमार्फत २८ मार्च २००५ रोजी मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामध्ये पालिकेला प्रतिमाणसी प्रतिदिन १५० लिटरप्रमाणे पाणीवापर करुन पाणीवापरात बचत करावी तसेच प्रतिवर्षी पाणी मागणीचा आढावा घेऊन त्या त्या वर्षाच्या पाणीवापराचे आरक्षण निश्चित करावे, त्यानुसार पाणीवापराच्या आरक्षणाचा समावेश पालिकेच्या करारनाम्यात करावा तसेच अंतिमत: पाणी आरक्षण ३२५.४५ दलघमीच्या वर जाणार नाही याची दक्षता घ्यावी, मलनि:स्सारची प्रक्रिया राबवून पुनर्वापरासाठी जलसंपदा विभागास पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा अटी घालण्यात आल्या होत्या.पालिकेच्या जादा पाणी वापरासंदर्भात विठ्ठल जराड (रा. उरवंडी कप, ता. बारामती) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्यांनी ४०.७६ लाख लोकसंख्येला ८.१९ टीएमसी वार्षिक पाणीवापर निश्चित केला आहे.महापालिका आयुक्तांनापाणीवापर जास्त असल्याचे मान्य, मात्र कायदा-सुव्यवस्थेची भीतीमहानगरपालिकेचा वापर मापदंडापेक्षा जास्त खूप जास्त आहे. वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी महानगरपालिका आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. मात्र, सद्य:स्थितीत पाणीकपात केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती महानगरपालिका आयुक्तांनी २७ आणि २८ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत व्यक्त केली असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.पाण्याबाबतपालकमंत्र्यांची आज बैठकबैठकीत पाणीकपातीच्या निर्णयाची शक्यतापुणे : शहराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन पुणेकरांना येत्या जुलैअखेरपर्यंत पुरेल अशा पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समवेत बुधवारी (दि.९) महापालिकेतील पदाधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून वारंवार पाणीवापराबाबत येणाºया पत्रांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत शहराच्या पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यानंतर पालकमंत्री आणि पाटबंधारे खात्यातील अधिकाºयांची चर्चा होणार आहे. त्यामुळे पाणीकपात लागू होण्याचीचिन्हे आहेत.शहराच्या पाणीपुरवठ्यात दोनशे एमएलडी पाण्याची कपात करण्याच्या भूमिकेवर पाटबंधारे खाते ठाम आहे. तसे झाल्यास पाणीकपात करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानेही पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ११५० एमएलडीनुसार पुणेकरांना रोज पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिका प्रशासनाच्या पातळीवर सुरू असून, एवढ्या पाणीसाठ्यात दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बापट यांनी महापालिकेतील पदाधिकारी-सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली आहे.पालिकेच्या पाणीवापराबाबत सचिवांना पत्रपालिका सद्यस्थितीत १३५० एमएलडी (१७.४० टीएमसी) पाणीवापर करीत आहे. त्यामुळे हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमधील सिंचनाला पाणी अपुरे पडत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ आॅक्टोबर२०१८ रोजीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळी हंगामात एक आवर्तन देण्याचे नियोजन ठरले होते. पालिकेसाठी ११५० एमएलडीची (१४.८२ टीएमसी) मर्यादा निश्चित करण्यात आली होती.पालिकेने या बैठकीनंतर गेल्या तीन महिन्यांत पाणीवापर केला नाही. बंद जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतरही पालिकेचा पाणीवापर १३५० एमएलडी इतकाच आहे. पालिकेच्या पाणीवापर कमी न करण्यामुळे उन्हाळी हंगामात पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहणार नाही. ग्रामीण भागास सिंचन व पिण्यासाठी उन्हाळी हंगामात नियोजित असलेले आवर्तन देणे शक्य होणार नाही. यासोबतच सिंचनासाठी कालवा सल्लागार समितीच्या नियोजनाप्रमाणे उन्हाळी आवर्तन दिल्यास पुणे शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.त्याअनुषंगाने पालिकेचा पाणीवापर नियंत्रित करण्यासाठी व प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार पाणीवापर करण्याबाबत महापालिका आयुक्तांना कळविण्यात आले आहे.अधीक्षक अभियंता चोपडे थेट पत्र देऊ शकत नाहीत. महामंडळाकडून हा विषय शासनाकडे येईल तेव्हा त्यावर विचार केला जाईल. हा विषय महामंडळाच्या अखत्यारीतील आहे. चोपडेंनी कार्यकारी संचालक अन्सारी आणि मुख्य अभियंता टी. एन. मुंढे यांना कळविणे आवश्यक होते. थेट पत्र लिहिले असल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. त्यांनी परस्पर पत्र लिहिणे योग्य नाही.- अ. अ. कपोले, उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी