पाबळ व परिसरातील भागात पावसाने ओढ दिल्याने या भागाला पाण्यासाठी मुख्य स्रोत असणाऱ्या थिटेवाडी बंधारा कोरडा पडला असून, येथील पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाले आहेत. पाबळ व परिसरातील बारा वाड्या वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, या भागाला शासकीय टँकर देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या गावठाणामध्ये अनेक लोक टँकरने पाणी विकत घेत असून, पाचशे ते हजार रुपयाला पाच हजार ते सात हजार लिटरचा टँकर विकत घेण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. सध्या दोन दिवसांनी नळाला पाणीपुरवठा होत असून, या भागातील हॉटेल व्यावसायिकांना देखील पिण्याचे पाणी त्याचबरोबर वापरण्याचे पाणी टॅंकरद्वारे घेण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर पिण्यासाठी पाणी दहा ते वीस रुपयाला १५ लिटर मिळत असल्याने येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न पैसे देऊन का होईना, परंतु थोडाफार दिलासा मिळत आहे. या भागासाठी कायमस्वरूपी शेतीसाठी व पिण्याचा पाणीपुरवठा (फिल्टरेशन पाणी) येत्या काळात मिळावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
180821\20210816_191021.jpg
पाबळ ता. शिरूर पाणी टंचाई