पुणे : यंदा राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊनदेखील उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे मार्च महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पुणे विभागात आजअखेर ३५ टँकर सुरू झाले असून, त्यामुळे ३७ गावे व तब्बल १६७ वाड्या-वस्त्यांमधील ७१ हजार ५०३ लोकसंख्या पाणीटंचाईने बांधित झाले आहेत.विभागात मागील ३ वर्षे सतत दुष्काळ परस्थिती असल्याने अत्यंत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती; परंतु यंदा सर्व भागात चांगला पाऊस झाल्याने बहुतेक सर्व धरणे शंभर टक्के भरली. त्यामुळे यंदा पाणीटंचाईच्या झळा मागील दोन वर्षांच्या तुलनेत कमी जाणवतील; परंतु गेल्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून, मार्च महिन्यात टँकर सुरू झाले आहेत. यामध्ये सर्वांधिक २१ टँकर सांगली जिल्ह्यात सुरू झाले असून, पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात ३ टँकर सुरू झाले आहेत. सातारा जिल्ह्यात १२ टँकर सुरू झाले आहेत. (प्रतिनिधी)
पुणे विभागाला पाणीटंचाईच्या झळा
By admin | Published: March 19, 2017 5:12 AM