शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

पाणी उजनीत सोडू नये

By admin | Published: November 12, 2015 2:28 AM

चासकमान धरणाचे पाणी उजनी धरणात सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने एकतर्फी घेतलेल्या निर्णयास स्थगिती मिळावी

रांजणगाव गणपती : चासकमान धरणाचे पाणी उजनी धरणात सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने एकतर्फी घेतलेल्या निर्णयास स्थगिती मिळावी म्हणून दाखल केलेल्या अर्जावर १७ नोव्हेंबरला मुंबई येथे सुनावणी होणार आहे. तोपर्यंत चासकमानचे पाणी उजनी धरणात सोडू नये, असे आवाहन माजी आमदार अशोक पवार यांनी केले आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पुणे, कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता चासकमान प्रकल्प यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, चासकमान धरणाचे ३.१४ टीएमसी पाणी उजनी जलाशयात सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतला आहे तो घेतांना चासकमानच्या लाभार्थ्यांना विचारात घेतले नाही. त्यांना यासंबधी आपले म्हणणे मांडण्याची संधी सुध्दा दिली नसून तो संपूर्णपणे एकतर्फी व चुकीचा घेतला आहे. या निर्णयाविरोधात पवार यांनी लाभार्थ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात प्राधिकरणाच्या निर्णया विरोधात अपिल करावयाचे असल्याने प्राधिकरणाने त्यांच्या स्वत:च्या पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती द्यावी यासाठी प्राधिकरणाचे सदस्य सोडल यांचेकडे अर्ज सादर केला होता.या अर्जातील चासकमानचे पाणी उजनीला सोडण्यासंदर्भातील शेतक-यांच्या भावना अडीअडचणींचा विचार करुन या अर्जाची सुनावणी येत्या १७ तारखेला मुंबई येथे प्राधिकरणाच्या कार्यालयात होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शिरुर तालुकयातील कोळगाव डोळस, निर्वी, गुनाट, कासारी, भांबार्डे, निमगाव म्हाळुंगी, न्हावरा, खंडाळे, कोंढापुरी, अांबळे, करंजावणे यासह तालुकयातील पश्चिम पटटयातील गावामंध्ये आताच मोठया प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. (वार्ताहर)