पाणालोट क्षेत्रात ८२ मिमी पाऊस : उजनी मायनस ५१़८१ टक्केबेंबळे : सोलापूर जिल्ह्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात ८२ मिमी पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात १ टक्के वाढ झाली आहे़ उजनी धरणाची मायनस पातळी विक्रमी वजा ५२़८२ टक्केपर्यंत खाली गेले होते़ उजनी धरणाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात निचांकी पातळी म्हणून नोंदविली गेली आहे़ मान्सूनपूर्व पावसाने चांगल्या प्रकारे सुरूवात केल्यामुळे उजनी धरणाची खालावत जाणारी पाणीपातळीत प्रथमच वाढ झाली आहे़ गेल्या चार ते पाच दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली सुरूवात झाली आहे़ आतापर्यंत ८२ मिमी पाऊस एका दिवसात नोंदविला गेला आहे़ त्यामुळे उजनी पाणीपातळी मायनस ५२़८२ टक्यांवरून मायनस ५१़८१ टक्के इतके झाले आहे़ त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी उजनीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास लवकरच सुरूवात झाली आहे़ मान्सून दाखल होण्यापूर्वी उजनीत पाणी साठा वाढ झाल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे़१८ धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊसआतापर्यंत उजनी धरणाच्या वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसास सुरूवात होत असायची़ पण यावर्षी मात्र उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लवकरच पावसास सुरूवात झाली आहे़ त्यानंतर १८ धरणाची पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला आहे़ त्यामुळे पाणलोट क्षेत्रात जास्त पावसाची नोंद झाली आहे़ धरण क्षेत्रात पडलेला पाऊसपिंपळगाव : ०़०० टक्केमाणिक डोह : ०़०० टक्केयेडगांव : ७़७१ टक्केवडज : ३़३८ टक्केडिभें : ०़१० टक्केघोड : ०़०० टक्केकलमोडी : १२़३३ टक्केचासकामान : ६़६७ टक्केभामा आसखेड : १९़७९ टक्केवडिवले : २२़६४ टक्केआंध्रा : ४५़७४ टक्केपवना : १५़२१ टक्केमुळशी : १९़८० टक्केतरसगांव : ०३़३३ टक्केपानशेत : ९़०६ टक्केखडकवासला : ३८़७८ टक्केउजनी : मायनस ५१़८१ टक्केविसापूर : ७़८७ टक्केटेमदार : ०़०४ टक्के़