शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भिगवणला वाळूउपसा करणाऱ्या ३८ बोटींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 2:41 AM

जिलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त; उजनी पाणलोट क्षेत्रात वाळूमाफियांवर कारवाई

भिगवण : महसूल पथकाने वाळूमाफियांचे हात चांगलेच आवळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारवाईचे सत्र सुरूच आहे. खानवटे (ता.दौंड), डिकसळ (ता. इंदापूर) आणि कात्रज (ता. करमाळा) येथील भीमा नदीपात्रात पहाटे साडेचार वाजता कारवाई केली. तीनही तालुक्यांच्या संयुक्त पथकाने दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तब्बल ३८ वाळूउपशाच्या फायबर बोटी जिलेटिनच्या साह्याने उडविण्यात आल्या. रात्री ८ वाजेपर्यंत कारवाई चालूच होती.गुरुवारी (दि. १४) उजनी पाणलोट क्षेत्रात वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळताच इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी व करमाळ्याच्या तहसीलदारांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना घेऊन स्वत: पाण्यात उतरून दिवसभर धडक कारवाई केली. २६ वाळू उपसा करणाºया बोटी आढळून आल्या, त्यावर स्वत: तहसीलदार यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिलेटिनचा स्फोट करून बोटी उद्ध्वस्त केल्या.इंदापूरमधील तक्रारवाडी-डिकसळ येथे वाळूउपसा करून दौंड तालुक्यातील खानवटे आणि कात्रज गावात वाळू बाहेर काढणाºया वाळूमाफियांवरील ही कारवाई राज्यातील सर्वांत मोठी कारवाई आहे. कारवाईत दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी, सोनाली मेटकरी, सचिन आखाडे, निवासी नायब तहसीलदार यांच्यासह पोलीस केशव चौधर, अविनाश कांबळे यांनी कारवाई पथकात सहभाग घेतला होता.सर्वांत मोठी कारवाई : पथकाची कुणकुण लागताच साहित्य सोडून पसारउजनी पाणलोट क्षेत्रात महसूल विभागाचा फौजफाटा घेऊन तहसीलदार येणार असल्याची खबर वाळूमाफियांना लागताच, वाळू उपसा करणारे चोरटे तहसीलदारांची गाडी पाहून पसार झाले. त्यामुळे उजनीच्या नदीपात्रातील ज्या १३ फायबरच्या बोटी आणि १३ सेक्शन अशा २६ वाळूउपसा करणाºया बोटी आढळून आल्या, त्यावर स्वत: तहसीलदारांनी महसूल कर्मचाºयांच्या मदतीने जिलेटिनचा स्फोट करून त्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईमुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात वाळूउपसा करणाºया माफियांचे धाबे दणालले आहे. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बोटी उद्ध्वस्त केल्याने वाळूमाफियांना बसला आहे. ही कारवाई इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावी सकाळपासून १० पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे वाळूमाफियांचे फावले होते. शासकीय यंत्रणा निवडणूक कामकाजात व्यस्त असल्याने वाळू- माफियांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस चालू केला होता.त्यामुळे संयुक्त कारवाई करीत वाळूमाफियांचे कंबरडे मोडण्याची कारवाई करण्यात आली आणि वाळू- माफियांनी असे कृत्य केल्यास त्यांना शासकीय नियमनुसार दंड ठोठावून तुरुंगाचीही हवा खावी लागेल, त्यामुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात गौण खनिजाची चोरी करणाºया वाळूचोरांनी इथून पुढे पाण्यात वाळूउपाशाची बोट सोडली, तर याद राखा... असा सज्जड दम तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी वाळूमाफियांना दिला आहे.