शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

पाणीपुरवठ्याची भिस्त टॅँकरवरच

By admin | Published: July 07, 2015 4:48 AM

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहर आणि परिसरात झालेल्या दमदार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील धरणांमध्ये चार महिन्यांचा पाणीसाठा झाला.

पुणे : जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहर आणि परिसरात झालेल्या दमदार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील धरणांमध्ये चार महिन्यांचा पाणीसाठा झाला असला, तरी पुणेकरांना अद्यापही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे जून महिन्यातही शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचा आकडा १५ हजारांच्या घरात पोहोचला होता. विशेष म्हणजे एकीकडे पावसाळ्यात पाण्याची मागणी कमी होत असताना, टँकरच्या फेऱ्यांमध्ये मात्र कोणतीही घट झालेली नसल्याचे दिसून येते. -------------शहराचा आकार बशीसारखा असल्याने तसेच महापालिकेची पाणी वितरण व्यवस्था जुनाट असल्याने शहरात असमान पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव पाण्यासाठी खासगी, तसेच महापालिकेच्या टँकरचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे शहरात जवळपास वर्षभर टँकरच्या पाण्याची मागणी असते. मात्र, हे प्रमाण जून ते डिसेंबर या कालावधीत दर महिन्यास सरासरी १० ते ११ हजार असते, तर जानेवारी ते मेपर्यंत हा आकडा सुमारे १५ हजारांच्या घरात जातो.या वर्षी जून महिन्यातच पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतरही ३० जून अखेर शहरात सुमारे १४ हजार ६०० टँकरच्या फेऱ्या झालेल्या असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मे २०१५च्या तुलनेत ही टँकरची संख्या अवघी ४००ने घटली आहे. (प्रतिनिधी)खासगी टँकरचीच चलतीशहरात जून महिन्यात तब्बल १४ हजार ६०० टँकरच्या फेऱ्या झालेल्या असल्या, तरी त्यातील अवघ्या १ हजार २८४ फेऱ्या महापालिकेच्या टँकरच्या आहेत. तर उर्वरित १३ हजार फेऱ्या या खासगी टँकरच्या आहेत. महापालिकेच्या ताफ्यात अवघे १५ टँकर असल्याने, तसेच ज्या ठिकाणी पाणी नाही आले त्याच ठिकाणी पालिकेकडून नगरसेवकांच्या मागणीनुसार टँकर पुरविला जातो. मात्र, पाणी कमी आल्यास अथवा कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना मनमानीदाराने शुल्क वसूल केल्या जाणाऱ्या खासगी टँकरचाच आधार घ्यावा लागत असल्याचे यावरून दिसून येते.