पुणे : येत्या गुरुवारी (दिनांक ०५/०५/२०२२) पुणे शहरात काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ०६/०५/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करण्याची विनंती पुणे महापालिकेकडून करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
१) वडगाव जलकेंद्र परिसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार,
दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.
२) भामा आसखेड प्रकल्प :
i) विमाननगर टाकी परिसर: संजय पार्क, संपूर्ण विमाननगर म्हाडा कॉलनी, एस. आर. ए. भाग, कुलकर्णी गरज भाग, यमुना नगर, दत्त मंदिर परिसर इ.
ii) धानोरी टाकी परिसर : कमल पार्क, माधव नगर, धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी नगर, गोकुळ नगर, भैरवनगर, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर, सिद्धार्थ नगर, सुदामा नगर, अंबानगरी, हरिकृष्ण पार्क, इ.