पुणे : वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत व पंपिंगविषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (दि. ३०) कात्रज, आंबेगाव, धनकवडी भागात गुरुवारी पूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी दि. ३१ मे रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी याबाबत माहिती दिली. वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत / पंपींगविषयक देखभाल दुरूस्तीच्या कामाबरोबरच धनकवडी येथील शिवशंकर चौक येथे कल्व्हर्टचे काम सुरू आहे. या कामामध्ये अडथळा आणणारी ७९६ मीमी व्यासाची पाईप लाईन शिफ्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खालील भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
वडगाव जलकेंद्र परिसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी. सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.
राजीव गांधी पंपिंग :- सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, भोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागरनगरमधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग ३८मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग ४१ व येवलेवाडी परिसर इ.