पुणे : शहरातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा आज (शनिवार दि़ २६ सप्टेंबर) पुर्ण दिवस बंद राहणार आहे. शहराच्या पूर्व, दक्षिण भागासह शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, शिवाजीनगर, गोखलेनगर आदी भागात सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान पाणीपुरवठा होणार नसल्याचे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र व नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारितील ३ हजार मि़मी़ रॉ वॉटर लाईनचे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेणे जरूरी असल्याने, शनिवारी शहरातील बहुतांशी भागात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. यामध्ये लष्कर जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, कोळपडळ, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, फतिमागनर, संपूर्ण घोरपडी, बी़टीक़वडे रोड, रामटेकडी, वैदूवाडी, आदी भागात, तर बंडगार्डन अंतर्गत येणाऱ्या खराडी व चंदननगर भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याचबरोबर पर्वती जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या बिबवेवाडी संपूर्ण परिसर, डायस प्लॉट परिसर, मार्केटयार्ड, गुलटेकडी, सहकारनगर, भवानी पेठ, नाना पेठ, गंज पेठ, फुले पेठ, घोरपडी पेठ, मुंकुंदनगर, सॅलिसबरी पार्क, महर्षिनगर, पद्यमावती, इंदिरानगर, तळजाई वसाहत आदी भागात व वडगाव जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच एस़एऩडी़टी़ पंपिग अंतर्गत येणाऱ्या शिवाजीनगर, सुतारदरा, किष्किंदानगर, कोथरूड, गोखलेनगर, शास्त्रीनगर, पांडवनगर, रेव्हेन्यू कॉलनी, आपटे रोड व घोले रोड इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नाही. वरील सर्व भागांमध्ये रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.
पुणे शहरातील बहुतांशी भागाचा पाणीपुरवठा आज बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:27 PM
शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, शिवाजीनगर, गोखलेनगर आदी भागात सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान पाणीपुरवठा होणार नाही.
ठळक मुद्देवरील सर्व भागांमध्ये रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार