पुणे : वारजे जलकेंद, खडकवासला उपसा (रॉ वॉटर) केंद्र तसेच रायझींग मेन लाईनवर स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी काम करावयाचे असल्यामुळे, येत्या २७ जानेवारी (गुरूवारी) कोथरूड, डेक्कन, बाणेर-बालेवाडी तसेच विमाननगर व लोहगाव परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे़ तसेच २८ जानेवारी (शुक्रवारी) रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे़.
पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कामामुळे २७ जानेवारी रोजी वारजे जलकेंद्र येथील पंपींग बंद ठेवावे लागणार आहे़ यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र तसेच नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बंद राहणार असलेला भाग पुढील प्रमाणे (वारजे जलकेंद्र) : भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरूड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानी नगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड
नवीन होळकर जलकेंद्राकडील परिसर : कळस, धानोरी, विमाननगर, लोहगाव, पंचायत, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रस्ता, बोपोडी, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलिस लाईन, मुळा रोड, संगमवाडी, पाटील इस्टेट, भांडारकर रस्ता इत्यादी़