सातारा रोड आणि पर्वती परिसरातला पाणीपुरवठा आज विस्कळीत झाला आहे. सकाळचा ऐवजी या भागाला संध्याकाळी ४ नंतर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
या परिसराला पाणीपुरवठा करणारी हाय सर्व्हिस रिसरवायर पाईपलाईन रात्री फुटली त्यामुळे सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी, शिवदर्शन , तावरे चौक, अरण्येश्वर, अशा अनेक भागांना पाणीपुरवठा झाला नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळाले. शिवदर्शन, तावरे चौक, अरण्येश्वर, निर्मल बाग, शिंदे शाळे समोरील भाग सकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत व कमी दाबाने झाला. या भागात सकाळी ५ ते ९ चा दरम्यान पाणीपुरवठा होतो. मात्र पाणी लवकर गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
या भागाचा पाणीपुरवठा संध्याकाळी चारनंतर सुरळीत होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. " आम्ही या पाइपलाईन ची दुरुस्ती तातडीने हाती घेतली आहे. लवकरात लवकर इथला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संध्याकाळी ४ नंतर या परिसरात पाणीपुरवठा करण्यात येईल" असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.