पुणे : पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्थापत्यविषयक, तसेच विद्युत व पम्पिंग विषयाची कामे करणे गरजेचे असल्याने, येत्या गुरुवार दि. ६ जानेवारी रोजी शहरातील मध्यवर्ती भागासह, पर्वती, सिंहगड रस्ता, वडगाव व लष्कर परिसरातील पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे, तसेच शुक्रवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली़
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
वडगाव जलकेंद्र परिसर - सिंहगड रस्ता, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.
पर्वती जलकेंद्र परिसर :- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर (स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, भवानी पेठ व नाना पेठ येथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.)
लष्कर जलकेंद्र परिसर :-पुणे कॅन्टोन्मेंट सर्व भाग, जांभुळकर मळा, रामटेकडी, हेवन पार्क, आशीर्वाद पार्क, हडपसर, सय्यदनगर, काळेपडळ, महंमदवाडी, ससाणेनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रोड, गोंधळेनगर, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी घोरपडी गाव व परिसर, वानवडीगाव, बी.टी. कवडे रोड, उदय बाग, कवडे मळा, मगरपट्टा, हांडेवाडी रोड, मंतरवाडी, सोलापूर रोड, डोबडवाडी, सोपानबाग, तसेच उत्तर बाजूस फातिमानगर, एस.व्ही.नगर परिसर, सेंट पॅट्रिक टाऊन, शेवकर वस्ती इत्यादी.