लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे विभागात ६ लाख ७० हजार ५४६ नागरिकांना ३३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, अवघ्या १० दिवसांत टंचाईग्रस्त गावांची संख्या ११६नी वाढली आहे. सध्या ३६३ गावांतील २ हजार १९७ वाड्यावस्त्यांवर टँकर पुरविण्यात येत आहे.जिल्ह्यात सध्या ५१ टँकरनी पाणीपुरवठा केला जात असून सर्वाधिक टँकर बारामती तालुक्यात पुरवले जात आहेत. पुरंदरसाठी १२, आंबेगाव ९, भोर २, जुन्नर ५, इंदापूर २, खेड येथे २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील माण ४५, कोरेगाव १६, वाई ६ , पाटण ३, फलटण ७, खटाव १८, जावळी ६, सातारा २, कराड ३ आणि महाबळेश्वरमध्ये २ टँकर सुरू आहते. सांगलीतील जत ९४, तासगाव १९, कवठे महाकाळ १४, आटपाडी २२, शिराळा ३ आणि खानापूरला १७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २२२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
पुणे विभागातील साडेसहा लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
By admin | Published: May 12, 2017 5:22 AM