पुणे : पर्वती जलकेंद्राअंतर्गत ६०० मिलिमीटर जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबविण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.२५ ) शहराच्या पूर्व भागातील काही पेठा व लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या जलवाहिनीतुन पाणी पुरवठा होणा०या सर्व भागाला शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पर्वती जलकेंद्रातील टाकीवरून भवानी पेठेकडे जाणाऱ्या ६०० मिमी व्यासाच्या वाहिनीत स्वारगेट मेट्रो स्टेशन समोरच्या बाजूस मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. ही गळती थांबविण्यासाठी येत्या गुरुवारी काम केले जाणार आहे. त्यामुळे शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकिज मागील परिसर, पर्वती दर्शनचा काही भाग, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकिज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.