जय मल्हार फाउंडेशनतर्फे जेजुरी परिसरातील डोंगरदऱ्यातील वन्य पशू आणि पक्ष्यांसाठी दरवर्षी उन्हाळ्यात वनखात्याने बांधलेल्या पाणवठ्यातून पशुपक्ष्यांची टँकरने पाणीपुरवठा करून तहान भागवली जाते. तसेच पाणवठ्याच्या आजूबाजूला धान्य ठेवून पक्ष्यांना खाद्यही पुरवले जाते. यंदाही फाउंडेशनने टँकरने पाणी आणि धान्यपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते वनविभागाच्या पाणवठ्याच्या हौदात टँकरने पाणी सोडून शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर पाणवठ्याच्या परिसरात पक्ष्यांना धान्यही ठेवण्यात आले. या वेळी वन विभागाचे वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, जयश्री पवार, गजानन बयास, तसेच या सेवेत पुढाकार घेणारे मनोज मोहिते, सचिन कुंभार, संदीप घोरपडे, सचिन पेशवे, रज्जाक तांबोळी, अभिजित बारभाई, अमित दरेकर, धनंजय नाकाडे, नीलेश वीरकर, बाबू गावडे आदी उपस्थित होते.
०८ जेजुरी