शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

ठेकेदारांच्या अडवणुकीमुळे पाणी पाणी रे

By admin | Published: December 25, 2015 1:55 AM

शहरातील अनेक आळ्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने २ कोटी ८५ लाख ५६ हजारांच्या कामांना नगरपालिकेने मंजुरी दिली आहे.

भोर : शहरातील अनेक आळ्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने २ कोटी ८५ लाख ५६ हजारांच्या कामांना नगरपालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र, सहा महिने झाले ठेकेदार काम करीत नाही. त्यामुळे कमी दाबाच्या पाण्यापासून नागरिकांची सुटका झालीच नाही.वेळेत कामे सुरू झाली नाही तर पुन्हा मुदतवाढ मागवी लागू शकते. त्यामुळे यावर्षी पाणीपुरवठा सुरळीत होणे अशक्य वाटत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. त्यामुळे नगरसेवकांनी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार संग्राम थोपटे यांनी शहरातील सुभाष चौक ते बौद्धवस्ती (२,८४,१,७६० रु.), पोलीस स्टेशन ते नगरपलिका (५,६३,४,२२० रु.), नगरपलिका ते सुभाष चौक (६,१४,५,४८० रु.), धुमाळनगर (२,८३,४,३९० रु.), वेताळपेठ (५,५६,७,७४० रु.), फिल्टर दुरुस्ती (५,४३,२,७०० रु.) अशी एकूण २ कोटी ८५ लाख ५६ हजार २९० रुपयांची कामे मंजूर करून आणली. यात सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटरची ६ इंची, ८ इंची व १२ इंची पाईपलाईन कामांचे टेंडर १२ व १३ जुलै रोजी विविध ठेकेदारांनी भरले. त्यापैकी नळ पाणीपुरवठा पाईपलाईनची पाचही कामे बी. जी. नलावडे यांना तर फिल्टर दुरुस्तीचे काम एस. के. एन्टरप्रायजेस यांना मिळाले. सदरची कामे मंजूर होऊन सहा महिने झाले आहेत. तर नगरपलिकेने २२ सप्टेंबरलाच कामाची वर्कआॅडर दिली आहे, म्हणजे त्यालाही तीन महिने उलटले; मात्र अद्याप कामे सुरू झालेली नाहीत.याबाबत भोर नगरपलिकेने संबंधीत ठेकेदाराला एक नोटीस दिली आहे. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. त्यामुळे शहरातील विविध आळ्यांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नगरपलिकेचा एकच फिल्टर सुरू असल्याने विनाफिल्टरचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. मात्र याकडे नगरपलिका प्रशासन व ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे.याबाबत ठेकेदार नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. नगरसेवकही वारंवार फोन करतात. मात्र त्यांचाही कधीच फोन लागत नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)