निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, बिजवडी, पोंदकुलवाडी या गावांच्या हद्दीतील वनक्षेत्रातील वास्तव्यास असणाऱ्या पशुपक्ष्यांच्या पाणवठ्यात बुधवारी (दि. २९) द एन्व्हायरमेंट असोसिएशन आॅफ महाराष्ट्राच्या वतीने टाक्यांमध्ये पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे या वनीकरणातील वन्य प्राण्यांसह पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. टाक्या पडल्या कोरड्याइंदापूर तालुक्यात वनीकरणाचे क्षेत्र जास्त आहे. यामध्ये प्रामुख्याने चिंकारा जातीच्या हरणांची संख्या लक्षणीय आहे. तसेच रानटी ससे, लांडगे, कोल्हे, तरस, खोकड या प्राण्यांसह सर्पमार गरुड, नराळ गरुड, चंडोल, माळ टिटवी, धाविक हे पक्षी मोठ्या संख्येने आहेत.सध्याच्या कडक उन्हात वनीकरणातील टाक्या कोरड्या पडल्या आहेत. त्या टाक्यांत असोसिएशनच्या वतीने टॅँकरने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पशुपक्षाच्या पाण्याची सोय झाली आहे.असोसिएशनच्या पुढील उपक्रमासही राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कर्मयोगीच्या पद्मा भोसले यांच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन कर्मयोगीचे संचालक बाजीराव सुतार यांनी दिले.
वनक्षेत्रातील टाक्यात सोडले पाणी
By admin | Published: March 31, 2017 11:57 PM