उरुळी कांचन : उरुळी कांचन गावाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून मुळा-मुठा उजव्या कालव्याचे पाणी शिंदवणे येथे लोखंडी ढाप्याच्या सहाय्याने अडविण्यात आले आहे. परंतु या पिण्यासाठी म्हणून अडविलेल्या पाण्याची कालवा परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर राजरोस चोरी होत असताना आणि भीषण पाणीटंचाई असताना उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासन चक्क झोपल्याने गावाला पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने मागील महिन्यात तीव्र विरोध पत्करून पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुठा कालव्याद्वारे खडकवासला धरणातून उन्हाळी आवर्तन फक्त पिण्याच्या वापरासाठी म्हणून सोडले होते. कालव्यातील पाण्याचे आवर्तन सुरू असताना कालव्याच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तसेच पोलिसांचा व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवून पाणीचोरी होऊ दिली नव्हती.
पाण्याची राजरोस चोरी
By admin | Published: June 02, 2016 12:38 AM