शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जवळार्जुनला पुरंदर उपसा योजनेतून जलवाहिनीद्वारे पाणी

By admin | Published: May 06, 2017 1:57 AM

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नियोजित कामासाठी जवळार्जुन ग्रामपंचायतीत पदाधिकारी, ग्रामस्थ व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नियोजित कामासाठी जवळार्जुन ग्रामपंचायतीत पदाधिकारी, ग्रामस्थ व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. पुरंदर उपसा योजनेची जलवाहिनी जवळार्जुन गावापर्यंत टाकण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये जवळार्जुन हे गाव माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दत्तक घेतले आहे. दीड-दोन वर्षांपासून येथे विविध कामे करण्यात आली आहेत. मागील महिन्यात २१ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत कामांचा आढावा घेण्यात आला, त्या वेळी ग्रामस्थांचा सहभाग नसल्याबद्दल त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. तसेच, उर्वरित कामे वेगाने करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना पवार यांनी केली होती.दरम्यान, संबंधित कामाचा आढाव्यासाठी जवळार्जुन ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुगार्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर टेकवडे, सरपंच सोनाली टेकवडे, उपसरपंच शिवाजी राणे, ग्रामसेवक एस. बी. लोणकर, रामभाऊ राणे, सचिन टेकवडे, जनार्दन टेकवडे, श्रीकांत राणे, सतीश साळुंखे, नवनाथ राणे, अंकुश टेकवडे आदी उपस्थित होते.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा उघडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शाखाही लवकरच सुरू होईल, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.नाझरे धरणावरील पाण्याचा फिल्टर दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. सोलर पवनचक्की बसविण्याबाबत प्रवीण शिंदे व सुदाम इंगळे यांनी माहिती दिली. पुरंदर उपसा योजनेचे पाणी ग्रामस्थ विकत घेतात; मात्र ७ ते ८ किलोमीटर अंतरावरून पाणी कालव्यातून येत असल्याने ते वाया जाते. याबाबत कोळविहिरे हद्दीमधून गेलेल्या पुरंदर उपसाच्या जलवाहिनीतून जवळार्जुन गावाच्या हद्दीपर्यंत जलवाहिनी टाकावी, अशी मागणी त्या वेळी ग्रामस्थांनी केली होती. पुरंदर उपसा योजनेचे अधिकाऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, लवकरच जवळार्जुनला थेट जलवाहिनीद्वारे पाणी मिळणार आहे. ओढा खोलीकरण, बंधारे बांधणे यासाठीचे अंदाजपत्रक तयार करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. कृषी विभागाच्या पाणलोट विकास योजना, जलयुक्त शिवार अंतर्गत कंपार्टमेंट बल्डिंग याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.