लोणी देवकर : सध्या उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे. काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उजनी धरणातील पाणी दूषित झाले आहे. हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही.
दूषित उजनी जलाशयाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. उजनी धरणघवरील पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र आज ओलिताखाली आले आहे. मात्र, या दूषित पाण्यामुळे उजनी काठावरील शेती धोक्यात आली आहे. तसेच या पाण्यावर अवलंबून असणा:या पुणो, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील ओलिताखाली येणा:या शेतावर विपरित परिणाम झाला आहे. काठावरील शेतीचे उत्पादनाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी रासायनिक खताचा वारेमाप वापर करून कसेबसे शेतीचे उत्पादन वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
मात्र, आणखी काही वर्षात ही संपूर्ण शेती नापीक होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या पाणी प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणणो गरजेचे बनले आहे. या परिसरातील पशूपक्षी यांच्या आरोग्यावरदेखील प्रदूषित पाण्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. उजनीतील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना मागील काही दिवसांतच घडली होती. सध्या देखील उजनीतील जलचरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी प्रदूषणाबाबत अहवाल शासनास सादर केले आहेत. अनेक कंपन्या प्रदूषित पाणी नदीपात्रत सोडून देत आहेत. सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ कागदावरच सुरू आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी कागदावरच अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही.
पाणी प्रदूषण रोखण्याऐवजी दररोज वाढतच आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वतीने नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी व संवर्धनासाठी नदी संवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 2क् राज्यांतील 38 नद्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ चारच नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पंचगंगा, कृष्णा, गोदावरी व तापी या नद्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये राज्यातील मोठय़ा नदीचा म्हणजे भीमा नदीचा यात समावेश करण्यात आला नाही.
सध्या या नदीचे पाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाले आहे. हे पाणी अगदी शेतीलाही दिले तरी पिकावर परिणाम होत आहे. उत्पादन घटले आहे. शेतीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढले असल्यामुळे जमिनीवर पांढ:या रंगाचा थर जमा होत आहे. (वार्ताहर)