सुपे येथील छप्पन मेरू मंदीर परिसरात येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन वन्य प्राण्यांकरिता पाणवठा तयार करून दिला. या पाणवठयाचे समर्पन बारामतीचे वन परिमंडल अधिकारी अमोल सातपुते व उषा भोंडवे यांच्या हस्ते करण्यात आला. याकरिता वनविभागाचे अधिकारी पाचपुते, माया काळे, गणपत भोंडवे, सुरेश गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. येथील पाणवठा तयार करीत असताना मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या काही पालकही यात सहभागी झाले. उषाताई भोंडवे यांनी पाणवठ्याला महत्वाची सामग्री दिली. माजी सरपंच मंदा खैरे, दत्तात्रय कदम, नितीन शितोळे, दत्तात्रय शेंडगे आदींनी सक्रिय नोंदविला अशी माहिती प्राचार्य योगेश पाटील यांनी दिली.
या प्रसंगी पाचपुते म्हणाले की, शाळा, पालक, विद्यार्थी व शिक्षक आदींनी सक्रीय सहभाग दिल्यास पर्यावरणाची मोठी जपणूक होण्यास मदत होईल. तसेच इतर सर्व शाळा व सामाजिक संस्थांनी असे पर्यावरणीय उपक्रम घेतल्यास वनविभाग सर्वतोपरी मदत करीन असे आवाहन त्यांनी केले.
-
चौकट
या उपक्रमात शिक्षकांनी पाणवठ्याच्या आकाराचा खड्डा तयार करून त्याला पाचट व काळी माती यांचे अस्तर देऊन त्यावरती दगड-गोट्यांचे अस्तरीकरण केले. त्यामुळे येथील पाणवठा सहा हजार लिटर क्षमतेचा झाला आहे. त्यामुळे सध्या या पाणवठ्यात मोठ्या पाणी साठून मोठ्या उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी मोठी सोय होणार आहे.
-------------------------
फोटो ओळी : सुपे येथील विद्याप्रतिष्ठानच्या कर्मचाºयांनी वन्यप्राण्यांसाठी श्रमदानातून तयार केलेला पाणवठा.
२६१२२०२०-बारामती-१०
-------------------------