राजेगाव : वाटलूज (ता.दौंड) येथील भीमा नदीपात्रात दौंड पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू उपसा करणाऱ्या ५ फायबर बोटी व ५ सक्शन बोटी जिलेटीनच्या साह्याने नष्ट केल्या. या कारवाईत वाळूमाफियांचे १ कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच ५० हजारांची १० ब्रास वाळूचा पंचनामा करून तहसीलदार संजय पाटील यांच्या आदेशाने ती नष्ट करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. २४) सायंकाळी ५च्या दरम्यान करण्यात आली. पथकाची चाहूल लागताच वाळू उपसा करणाऱ्या मंडळींनी पळ काढला.
या प्रकरणी टलूज गावचे गावकामगार तलाठी नंदकुमार संपतराव खरात यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नाना शेंडगे, महम्मद शेख,, शरद शेंडगे, माऊली झि, सलीम शेख (सर्व रा. वाटलूज) यांच्याविरुध्द चोरी करणे व गौण खनिजाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, सहायक फौजदार पोपट जाधव, पोलीस कर्मचारी दीपक वायकर, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, अमोल गवळी, किरण राऊत, विशाल जावळे, आमिर शेख, अमोल देवकाते, अभिजित गिरमे व नाना उबाळे तर महसूलचे रावणगाव मंडल अधिकारी मंगेश नेवसे, विजय खारतोडे, जयंत भोसले, दीपक आजबे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.
जर कोणी भीमा नदीच्या पात्रामधून अवैध वाळू उपसा केल्यास अशा प्रकारची कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला.
फोटो आहे : वाटलूज येथे जिलेटीनच्या साह्याने वाळू उपसा करणाऱ्या बोटी नष्ट करण्यात आल्या.