गेल्या दीड महिन्यापासून तळेगाव ढमढेरे- भैरवनाथनगर येथील वेळ नदीवरील बंधारा कोरडा ठणठणीत पडल्याने. परिसरातील विंधन विहिरीचे स्रोत खोलवर गेल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता.त्यामुळे पशू-पक्ष्यांसह नागरिक हवालदिल झाले होते.शेतीला पूरक असणारा दुग्ध व्यवसाय या परिसरातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर असल्याने या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता.नागरिक दीड महिन्यापासून पाण्याची वाट पाहत होते. हे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत नसून इतर वापरासाठी या पाण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याने नुकतेच पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
भैरवनाथनगर येथील बंधाऱ्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याला गळती असल्यामुळे अवघ्या सात दिवसांत एका दरवाजाच्या उंची इतके पाणी या बंधाऱ्याचे वाहून गेले आहे.त्यामुळे या बंधाऱ्यात जास्त काळ पाणी टिकणार नाही.गेल्या अनेक वर्षांपासून बंधाऱ्याच्या गळतीची समस्या अद्यापही कायम आहे.
२२ तळेगाव ढमढेरे पाणी
तळेगाव ढमढेरे-भैरवनाथनगर येथील पाण्याने भरलेला बंधारा.